Crime News Saam tv
महाराष्ट्र

Husband killed Wife: अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याच्या डोक्यात सैतान घुसला; डोक्यावर वार करत बायकोचा जीव घेतला

Nagpur Crime News: नागपुरातील हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. नंतर बनाव रचत मुलांसह पळ काढलाय. आरोपी पती अटकेत.

Bhagyashree Kamble

पत्नी अचानक घरातून बाहेर पडली. पतीला पत्नी दुसर्‍या कुणाशी प्रेमसंबंध असल्याचा आला संशय. काही वेळानंतर पत्नी घरी परतली. दोघांमध्ये टोकाचे भांडण, पतीला झाला राग अनावर अन् पत्नीच्या डोक्यात वार करून केली हत्या. ही धक्कादायक घटना नागपुरात घडलीय. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि गुन्हा लपवण्यासाठी पतीने पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासात पतीनेच अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आलीय.

नागपुरातील हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केलीय. मृत महिलेचे नाव राखी पाटील (वय वर्ष २७) आहे. तर आरोपी पतीचे नाव सुरज पाटील (वय वर्ष ३४) आहे. या जोडप्यांना २ मुलं असून, दोन दिवसांपूर्वीच तुळजाई नगरमध्ये हे कुटुंब भाड्याच्या घरात राहायला गेले होते.

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीला संपवलं

काही दिवसांपूर्वी राखी घरातून बाहेर पडली. ती नेमकी कुठे, कशाला आणि कुणाला भेटायला गेली? याची माहिती पतीला नव्हती. राखी काही वेळानंतर घरी परतली. पतीला पत्नीचे कुणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. टोकाच्या भांडणात पतीचा राग अनावर झाला अन् त्यानं जड वस्तू थेट पत्नीच्या डोक्यावर वार करत तिला जखमी केली. वार इतका जोरात बसला की, पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर सुरज राखीला घेऊन खासगी दवाखान्यात गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यासंदर्भात पतीची चौकशी केली असता, पोलिसांना सुरजने सांगितले की, पत्नी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून पडली. परंतू, घटनास्थळी रक्ताचे डाग आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर राखीचा मृत्यू तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे नसून, डोक्यावर वार केल्यामुळे झाले असल्याचं तपासात स्पष्ट झालं.

हत्येनंतर पती आपल्या मुलांसह पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी काही तासातच त्याला पकडले. आरोपीची पोलील कसून चौकशी करत असून, हुडकेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT