hundreds of farmers protest on sankeshwar banda toll plaza near kolhapur
hundreds of farmers protest on sankeshwar banda toll plaza near kolhapur Saam Digital
महाराष्ट्र

Kolhapur: आजरा-बांदा महामार्गावरील टोल नाक्यावर शेकडाे शेतक-यांचा माेर्चा, आंदाेलन तीव्र करण्याचा इशारा

Siddharth Latkar

- रणजीत माजगांवकर

आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती असे म्हणत आज (साेमवार) शेकडाे शेतक-यांनी संकेश्र्वर- बांदा मार्गावरील टोल नाक्याला माेर्चा काढून विरोध दर्शविला. या आंदाेलनास आजरा येथील नागरिकांनी शहर बंद ठेवून पाठिंबा दिला.

संकेश्र्वर- बांदा मार्गावरील टाेल नाका हटाव, आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खूर्च्या खाली करा अशा घाेषणा देत शेतकरी, नागरिक टाेल नाका परिसरात जमले. यावेळी टाेलमुक्ती संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी टाेल कायमचा हद्दपार करावा अशी मागणी केली.

संकेश्र्वर - बांदा मार्ग करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या. त्याचे पैसे अद्याप काहींना मिळालेल्या नाहीत. आजरा शहरानजीक टोल नाक्याची उभारणी केली जाणार आहे. या टाेल नाक्यावर काेणालाही सवलत अथवा टाेल माफी दिली जाणार नसल्याने परिसरातील शेतक-यांवर, नागरिकांवर अन्याय हाेणार आहे.

त्यामुळे आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती म्हणत टाेल विराेधी कृती समितीने टोल रद्द करण्याची मागणी केली. दरम्यान आंदाेलनास पाठिंबा देण्यासाठी आजरा शहर आज बंद ठेवण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jiya Shankar: अवघ्या महाराष्ट्राला ‘वेड’ लावणाऱ्या जिया शंकरचं मनमोहक सौंदर्य

Marathi Live News Updates: महाष्ट्रातील ३ नेत्यांकडे भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी

Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर

PM Modi Meets Team India: पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् टीम इंडियातील खेळाडूंमध्ये काय चर्चा झाली? पाहा VIDEO

Saam Impact Video: NCCF ने थांबवली कांद्याची खरेदी; घोटाळ्याच्या वृत्तानंतर 67 महासंघांची खरेदी बंद; साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट

SCROLL FOR NEXT