HSRP Number Plate Saam Tv
महाराष्ट्र

HSRP Number Plate: HSRP नंबर प्लेट लावण्याची शेवटची तारीख काय? ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

HSRP Number Plate Registration Last Date and Online Process: एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट असणे बंधनकारक असणार आहे.

Siddhi Hande

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP Plate) लावणे अनिवार्य केले आहे. यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. अजूनही अनेक वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी मुदतीपूर्वी बसवून घ्यावी. अन्यथा तुम्हाला दंड बसेल.

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP Plate बसवणे अनिवार्य

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांनी HSRP प्लेट बसवली आहे. परंतु १० टक्के लोकांनी ही प्लेट बसवले नसल्याचे समोर आली आहे. दरम्यान, राज्यात ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ आहे. त्यापूर्वी तुम्ही हे काम पूर्ण करा. २०१९ च्या आधी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावायची आहे.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Number Plate Online Registration Process)

  • सर्वप्रथम तुम्हाला https://bookmyhsrp.com/ या वेबसाइटवर जायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.

  • यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.

  • यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.

  • यानंतर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. ३०० ते ६०० रुपयांपर्यंत हा चार्ज असणार आहे.

  • यानंतर तुम्हाला हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा. हे जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT