Dhanshri Shintre
राज्यात HSRP नंबरप्लेट सर्वाधिक महाग का आहेत, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारला आहे.
याचिकाकर्तांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दुचाकीसाठी HSRP नंबर प्लेटसाठी तब्बल ४५० रुपये शुल्क आकारले जात आहे.
गुजरातमध्ये HSRP चा दर फक्त १६० रुपये असून, गोव्यात तो अधिकच कमी म्हणजे १५५ रुपये आहे, असं सांगितलं.
महाराष्ट्रात चारचाकीसाठी HSRP साठी ७४५ रुपये मोजावे लागतात, तर आंध्रप्रदेशमध्ये हा दर फक्त ६१९ रुपये आहे.
महाराष्ट्रात वाहनसंख्या सर्वाधिक असूनही HSRP साठी जास्त दर घेतले जात आहेत, त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसतोय.
राज्यात एचएसआरपी प्लेट स्वस्त दरात मिळेपर्यंत बंदी घालावी आणि सर्वत्र समान दर ठेवावेत, अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे.
गुजरात, गोवा, आंध्रप्रदेशात HSRP दर कमी असताना महाराष्ट्रातच सर्वाधिक असल्याचे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
इतर राज्यांत कमी दर शक्य असताना महाराष्ट्रात का नाही, असा सवाल करत न्यायालयाने परिवहन आयुक्तांना उत्तर देण्याचे आदेश दिले.