Dhanshri Shintre
सध्या भारतात लग्नाचा हंगाम सुरू असून, रोज अनेक विवाह होत असून विविध पारंपरिक रीतिरिवाजांचं पालन केलं जातं.
लग्नात मामा-आत्या यांना मान असतो, पण सगळ्यांचं लक्ष नवरीची बहीण किंवा करवलीकडेच सर्वाधिक केंद्रित असतं.
‘करवली’ म्हणजे नेमकी कोण? तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर चला, आज या शब्दाचा अर्थ समजून घेऊया.
लग्नात करवली ही हातात लहान कळशी घेऊन उभी असते, ज्याला ‘करा’ किंवा मातीची लहान घागरही म्हणतात.
हातात ‘करा’ म्हणजेच लहान कळशी घेत असल्यामुळे लग्नात त्या मुलीला ‘करवली’ असे संबोधले जाते.
आजच्या काळात पारंपरिक ‘करा’ ऐवजी लग्नात छोटी तांब्याची भांडी वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे.
करवली ही विवाहसोहळ्यात नवरदेव किंवा नवरीच्या सोबत राहून त्यांची काळजी घेते आणि तांब्याची जबाबदारी सांभाळते.
आपल्याकडे विवाहानंतर नवरीसोबत करवलीला पाठवण्याची प्रथा फार जुनी आणि पारंपरिक मानली जाते.