Wedding Rituals: लग्नात नवरदेवाचे बूट चोरण्याचा अर्थ काय आहे? परंपरेची मजा आणि रहस्य

Dhanshri Shintre

जुती चुराईचा रिवाज

भारतीय लग्नांमध्ये नवरदेवाचे बूट चोरणे ही एक प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा मुख्यतः उत्तर भारतातील हिंदू लग्नांमध्ये पाहायला मिळते.

Shoes Stealing Ritual | yandex

सामंजस्याचे प्रतीक

वधूच्या बहिणी किंवा मैत्रिणी बूट चोरून नवरदेवाला हलक्या फुलक्या रितीने चिडवतात.

Shoes Stealing Ritual | google

फक्त मजा-मस्करीसाठी

बूट चोरण्याचा उद्देश केवळ मजा आणि आनंद निर्माण करणे आहे. नवरदेव आणि वधूच्या कुटुंबीयांमध्ये या निमित्ताने एक आनंददायी संवाद होतो.

Shoes Stealing Ritual | google

बक्षीस

बूट परत करण्यासाठी वधूच्या बहिणी नवरदेवाकडून बक्षीस मागतात. नवरदेव कधी कधी पैसे, चॉकलेट, किंवा इतर भेटवस्तू देऊन बूट परत मिळवतो.

Shoes Stealing Ritual | google

नवरदेवाच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

नवरदेवाचे मित्र आणि भावंडे बूट वाचवण्यासाठी योजना आखतात, ज्यामुळे मजा दुपटीने वाढते.

Shoes Stealing Ritual | google

व्यवहारिकपणा

यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारिकपणाही समोर येतो.

Shoes Stealing Ritual | google

आनंदी वातावरण

बूट लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क आहे. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग बूट लपवण्याच्या विधीमुळे तेथे मनोरंजनाचा आणि हास्याचा भर दिला जातो.

Shoes Stealing Ritual | yandex

NEXT: मंगळसूत्रामध्ये दोन वाट्या का असतात? जाणून घ्या महत्त्व

येथे क्लिक करा