Dhanshri Shintre
हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी मंगळसूत्र हा सर्वात महत्त्वाचा अलंकार मानला जातो.
मंगळसूत्र हे लग्नाचे आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान केले जाते.
मंगळसूत्राचा महिमा प्राचीन काळापासून सांगितला जातो. ही हिंदू सनातन धर्माची परंपरा आहे जी आजही पाळली जाते.
मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते. लग्नानंतर स्त्रियां हे धारण करतात.
मंगळसूत्रात दोन पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात.
मंगलसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे.
शिव-शक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करावयाचा असतो.
दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी असते.
माहेरच्या वाटीत हळद, तर सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून, मंगळसूत्राची पूजा करून मग गळ्यात घातले जाते.
NEXT: लग्नात वर-वधू हातावर मेहंदी का काढतात? जाणून घ्या कारण...