ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही कधी विचार केलात का?रस्त्यावरुन जाणाऱ्या काही गाड्यांच्या नंबर प्लेटचा रंग वेगवेगळा का असतो?
तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत निरनिराळ्या रंगाच्या नंबर प्लेटचा अर्थ
पांढऱ्या रंगाची नंबर प्लेटही भारतातील सामान्य लोकांसाठी आहे.
पिवळ्या रंगाची नंबर प्लेट टॅक्सी,कॅब या वाहनांसाठी असते.
परदेशी प्रतिनिधीच्या प्रतिमंळातील व्यक्तीच्या वाहनांसाठी निळ्या रंगाची नंबर प्लेट वापरली जाते.
काळ्या रंगाची नंबर प्लेट खास व्यक्तीच्या गाडीमध्ये वापरली जाते अशी वाहन आपल्याला मोठ्या हॉटेल बाहेर दिसून येतात.
लाल रंगाची नंबर प्लेट राज्याच्या राज्यपालाचे किंवा देशाच्या राष्ट्रपतींच्या गाडीसाठी वापरली जाते.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी हिरव्या रंगाची असलेली नंबर प्लेट वापरली जाते.