FASTag Yearly Pass: एकदा ३००० रुपयांचा फास्टॅग पास काढा अन् वर्षभर मोफत प्रवास करा; केंद्र सरकार सुरु करणार नवी पॉलिसी

FASTag New Policy Of Yealy Pass Pass: वाहनधारकांसठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला फक्त ३००० रुपयांचा वार्षिक पास काढायचा आहे. या पासवर तुम्ही वर्षभर प्रवास करु शकतात.
FASTag New Policy
FASTag New PolicySaam Tv
Published On

आता प्रत्येक वाहनाला फास्टॅग असणे अनिवार्य आहे. फास्टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल. फास्टॅगबाबत सरकार आता नवीन पॉलिसी सुरु करण्याच्या तयारीत आहे. या नवीन पॉलिसीनुसार वाहनचाकांना वर्षातून फक्त एकदाच रिचार्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्ही वर्षभर फिरु शकतात. तुम्हाला कुठेही टोल भरावा लागणार नाही. याबाबत माहिती पुणे पल्स रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

FASTag New Policy
Mumbai Metro Fare Hike: मुंबईकरांना झटका, मेट्रोच्या तिकिटात वाढ होणार!

आता मिळणार फास्टॅगचा वर्षभराचा पास (Fastag Annual Recharge)

केंद्र सरकारच्या या नवीन पॉलिसीमुळे वाहनचालकांना हायवेवर वाहन चालवणे अधिक सोपे आणि सुलभ होणार आहे. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. नवीन प्रस्तावित टोल पॉलिसीनुसार, वाहनचालकांना दोन प्रकारचे टोल भरण्याचे ऑप्शन मिळते. यामध्ये एक ऑफ्शन असा की, वर्षभरासाठीचा पास. जर तुम्ही वर्षभराचा पास घेतला तर तुम्हाला कुठेही न थांबता सुसाट प्रवास करता येणार आहे. परंतु हा पास काही ठरावीक अंतरासाठी (Distance Based Pricing) असणार आहे. यानुसारच तुम्हाला टोल भरावा लागणार आहे. तुम्हाला वर्षभराचा पास भरावा लागणार आहे.

वार्षिक पाससाठी फक्त ३००० रुपयांचा रिचार्ज (Fastag Annual Recharge Of 3000 Rupees)

फास्टॅगच्या वर्षभराच्या पाससाठी तुम्हाला फक्त ३००० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. ही रक्क वर्षभरासाठी असणार आहे. हा पास काढल्यानंतर तुम्ही नॅशनल हायवे, एक्सप्रेस वे आणि इतर अनेक महामार्गावरुन प्रवास करु शकणार आहात. हा पास काढल्यावर तुम्हाला नेहमी नेहमी टोल भरण्याची गरज नाही.

फास्टॅगचा वर्षभराचा रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राचीही गरज लागणार नाही. तुमच्या सध्याच्या फास्टॅग अकाउंटवरुन तुम्ही हा पास काढू शकणार आहेत. सरकारने याआधीही अशी एक योजना सुरु केली होती. त्यात १५ वर्षांसाठी ३०,००० रुपये भरावे लागत होते. आता ही सेवा बंद झाली आहे.

FASTag New Policy
कामाची बातमी! Fastag नसेल तर भरावा लागणार दुप्पट टोल; आजपासून नवे नियम लागू

वार्षिक पासचे उद्दिष्ट

नवीन वार्षिक पासचे उद्दिष्ट हे आहे की, हायवे आणि एक्सप्रेसवरील टोल नाके बंद करणे. जर वाहनधारकांना वार्षिक पास काढला तर त्यांना टोल भरण्याची गरज नाही. यामुळे वेळेचीदेखील बचत होईल.

FASTag New Policy
NPS Scheme: दररोज ₹२०० गुंतवा अन् महिन्याला ५०,००० रुपयांची पेन्शन मिळवा, केंद्र सरकारची जबरदस्त योजना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com