NPS Scheme: दररोज ₹२०० गुंतवा अन् महिन्याला ५०,००० रुपयांची पेन्शन मिळवा, केंद्र सरकारची जबरदस्त योजना

NPS Scheme: केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला भरघोस परतावा मिळतो. दर महिन्याला फक्त २०० रुपये गुंतवून तुम्ही ५०,००० रुपयांची पेन्शन मिळवू शकतात.
NPS Schem
NPS SchemSaam Tv
Published On

कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीचे वय हे निश्चित असते. सेवानिवृत्तीनंतर पुढे पैशांची चणचण भासू नये,यासाठी खूप आधीपासूनच पैशांची बचत करणे गरजेचे आहे. पैशांची गुंतवणूक योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी करणे खूप गरजेचे आहे. ज्या गुंतवणूकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळेल त्याच ठिकाणी गुंतवणूक करायची असते. याचसोबत तुम्हाला ज्या गुंतवणूकीमध्ये सुरक्षितता वाटेल म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळतील, याची शाश्वती असेल त्याच योजनेत गुंतवणूक करा. तुम्ही सरकारच्या राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमध्ये गुंतवणूक करु शकतात.

NPS Schem
SBI Amrit Vrishti Scheme: स्टेट बँकेने ४४४ दिवसांची अमृत वृष्टी योजना पुन्हा केली सुरु; मिळतोय भरघोस परतावा

नॅशनल पेन्शन स्कीम

एनपीएस योजनेतील गुंतवणूक ही लाँग टर्म असते. या योजनेत तुम्हाला नोकरी करत असताना गुंतवणूक करायची असते. या योजनेतील रक्कम तुम्हाला गुंतवणूकीनंतर पेन्शन स्वरुपात मिळते. या योजनेत गुंतवलेली काही ठरावीक रक्कम तुम्ही एकाच वेळी काढू शकतात. तर उरलेली रक्कम तुम्हाला पेन्शन स्वरुपात मिळेल. या रक्कमेतून तुम्ही अॅन्युटी खरेदी करु शकतात. अॅन्युटी खरेदी केल्यावर तुम्ही जेवढी रक्कम गुंतवणार तेवढी तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरुपात मिळेल.

रोज २०० रुपये गुंतवा

या योजनेत तुम्ही जर दर महिन्याला फक्त ६००० रुपये गुंतवले तर तुम्ही सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला ५०,००० रुपये मिळवू शकतात. या योजनेत तुम्हाला दिवसाला फक्त २०० रुपये गुंतवायचे आहेत. या योजनेत तुम्हाला इन्कम टॅक्सपासूनही सूट मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला कलम 80CCD अंतर्गत अतिरिक्त ५०,००० रुपयांवर इन्कम टॅक्सपासून सूट मिळते.

एनपीएस योजनेत तुम्ही टिअर १ आणि टिअर २ असे दोन अकाउंट ओपन करु शकतात. टिअर १ एक मुख्य अकाउंट असेल . हे अकाउंट त्या लोकांसाठी आहे ज्यांचा पीएफ जमा होत नाही. या योजनेत तुम्ही ५०० रुपयांची गुंतवणूक करुन अकाउंट उघडू शकतात. या योजनेत रिटारमेंटनंतर तुम्हाला ६० टक्के रक्कम काढू शकतात.

NPS Schem
LIC Kanyadan Scheme: फक्त १२१ रुपये गुंतवा अन् मिळवा २७ लाख, मुलीच्या भविष्यासाठी LIC ची खास योजना

५० हजार रुपयांची पेन्शन मिळणार

या योजनेत जर तुम्ही एनपीएस अकाउंटमध्ये २४ व्या वर्षी दर महिन्याला ६००० रुपये गुंतवायला सुरुवात केली तर तुम्हाला ६० वर्षानंतर भरघोस रक्कम मिळणार आहे. या योजनेत तुम्ही ६० वर्षांचे होईपर्यंत २५,९२,००० रुपये गुंतवणार आहे. या योजनेत १० टक्के रिटर्न जरी मिळाला तरी तुमची कॉर्पस वॅल्यू २,५४,५०,९०६ रुपये मिळणार आहे. जर तुम्ही यातील ४० टक्के अॅन्युटी खरेदी करता तर ती रक्कम १,०१,८०,३६२ असणार आहे. यामुळे तुम्हाला दर महिन्याला ५०,९०२ रुपये पेन्शन मिळणार आहे.

NPS Schem
Post Office Saving Schemes: एक नंबर स्किम आहे भावा! ५ वर्षात व्हाल मालामाल, जाणून घ्या श्रीमंत होण्याचा मंत्र

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com