Post Office Saving Schemes: एक नंबर स्किम आहे भावा! ५ वर्षात व्हाल मालामाल, जाणून घ्या श्रीमंत होण्याचा मंत्र

Post Office RD Scheme: जर तुम्हाला मोठी रक्कम एकरकमी गुंतवणे शक्य नसेल तर काळजी करू नका, तुम्ही ५ वर्षांसाठी दरमहा एक निश्चित रक्कमेची गुंतवणूक करू शकता.
Post Office Saving Schemes
Post Office RD Schemesaam tv
Published On

थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. याच म्हणीप्रमाणे थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून तुम्ही मालामाल होऊ शकतात. या गुंतवणुकीतून तुम्ही श्रीमंत होऊ शकतात. जर तुम्ही चांगल्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर चांगली जोखीममुक्त योजना निवडणे चांगले. यासाठी पोस्ट ऑफिसच्या योजना उपयुक्त ठरू शकतात.

पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना आहेत, भविष्यात जास्त परतावा देणाऱ्या आहेत. यापैकी काही योजना दरमहा थोडीशी रक्कम गुंतवून काही वर्षांत मोठा परतावा घेऊ शकतात. कोणत्या पोस्ट ऑफिस योजनेत दरमहा २००० रुपये जमा करून ५ वर्षांत किती नफा मिळवता येईल हे जाणून घेऊ.

Post Office Saving Schemes
ITR फॉर्म भरल्यानंतरची एक चूक पडेल महागात, गमवाल रिफंड; जाणून घ्या नियम

पोस्ट ऑफिस आरडी योजना Post Office RD Scheme

पोस्ट ऑफिसच्या सर्वोत्तम बचत योजनांपैकी एक म्हणजे रिकरिंग डिपॉझिट स्कीम म्हणजेच आरडी स्कीम आहे. ही अशी योजना आहे, जी कोणत्याही जोखीमशिवाय प्रचंड नफा देते. या सरकारी योजनेत पैसे जमा होतात आणि सुरक्षितही राहतात. तुम्ही ५ वर्षांसाठी निश्चित रक्कम गुंतवू शकता. या योजनेत ३ किंवा ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता.

काय आहे विशेष

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम मासिक गुंतवणुकीसाठी आहे. तुम्ही दरमहा १०० रुपयांपासून आरडी सुरू करू शकता. ही सरकारची योजना असल्याने तुमचे पैसे १००% सुरक्षित असतात. यासोबतच त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा लाभ देखील निश्चित परताव्यांसह मिळत असतो. तसेच कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे.

जर तुमचे आरडी खाते उघडे असेल तर तुम्हाला आरडी खात्यावर कर्ज देखील मिळू शकते. या खात्यात नॉमिनेशन सुविधा देखील उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही कोणालाही नॉमिनेशन करू शकता.

५ वर्षात किती नफा होईल?

या योजनेअंतर्गत व्याजदर वार्षिक ६.७ टक्के आहे, जो तिमाही चक्रवाढ आधारावर मोजला जातो. जर तुम्ही दरमहा २००० रुपयांचा आरडी केला तर ६० महिन्यांत एकूण जमा रक्कम १,२०,००० रुपये होईल. या रकमेवर साधरण २१,९८३ रुपयांचा व्याज मिळेल. त्याअनुसार ५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर एकूण रक्कम १,४१,९८३ रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com