Murbad : पीएफ आणि पेन्शनसाठी १० वर्षापासून प्रतीक्षा; मुरबाडमधील निवृत्त एसटी कर्मचाऱ्याची इच्छामरणाची मागणी

Thane Murbad News : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अल्प स्वरूपात असते. दिले जाणारे पेन्शन देखील ५ ते १० हजार रुपयांच्या दरम्यान असते. महामंडळाकडून बऱ्याचदा हि रक्कम देण्यास विलंब
Thane Murbad News
Thane Murbad NewsSaam tv
Published On

मयुरेश कडव 

मुरबाड (ठाणे) : राज्य परिवहन महामंडळातील चालक व वाहक या कर्मचाऱ्यांना पगार कमी असतो. यात हे कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना मिळणारी रक्कम देखील अधिक नसते. शिवाय महामंडळाकडून ती लवकर मिळत नसल्याने निवृत्ती नंतर कर्मचारी अडचणीत सापडतो. अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये एसटी महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला १० वर्षांपासून पीएफ आणि पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळं या कर्मचाऱ्याने थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती केली आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम अल्प स्वरूपात असते. यात दिले जाणारे पेन्शन देखील ५ ते १० हजार रुपयांच्या दरम्यान असते. तरी देखील महामंडळाकडून बऱ्याचदा हि रक्कम देण्यास विलंब करण्यात येत असतो. यामुळे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडत असतो. अशाच प्रकारे मुरबाड मधील एसटी कर्मचाऱ्याला पेन्शन व पीएफ न मिळाल्याने तो अडचणीत सापडला आहे. 

Thane Murbad News
Samruddhi Mahamarg : अवैध रेती माफियांचा धुमाकूळ, समृद्धी महामार्गावरील १४ ठिकाणी क्रश बॅरियर तोडले

कुटुंबियांवर उपासमारीची वेळ  

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी असलेले मुरबाडमधील राजेंद्र सरनोबत हे १० वर्षांपूर्वी एसटीच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना अजूनही त्यांची पेन्शन, पीएफ मिळालेलं नाही. याबाबत त्यांनी आजवर अनेकदा मागणी, विनंती, पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळं सरनोबत यांच्यासह कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

Thane Murbad News
Bhandara : ऊस देऊन सहा महिने उलटले; चुकारे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक, कार्यालयाला लावले कुलूप

राष्ट्रपतींकडे केली मागणी 

दरम्यान कर्मचाऱ्याची होणारी ससेहोलपट सहन होत नसल्यानं अखेर निवृत्त कर्मचारी राजेंद्र सरनोबत यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे. परिवहन विभागाचे मंत्री हे ठाणे जिल्ह्यातलेच असून त्यांच्याच जिल्ह्यातल्या निवृत्त कर्मचाऱ्यांवर ही वेळ येत असेल, तर मंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घालावं, अशी अपेक्षा यानंतर व्यक्त होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com