LIC Kanyadan Scheme
LIC Kanyadan Schemegoogle

LIC Kanyadan Scheme: फक्त १२१ रुपये गुंतवा अन् मिळवा २७ लाख, मुलीच्या भविष्यासाठी LIC ची खास योजना

LIC Kanyadan Policy : मुलीच्या भविष्यासाठी LIC ची कन्यादान योजना खूप फायदेशीर ठरणार आहे. शिक्षण, लग्न आणि कर बचतीसाठी ही योजना उत्तम आहे.
Published on

LIC Kanyadan Policy Latest Update: गुंतवणूक हा बचतीचा सगळ्यात महत्वाचा पर्याय असतो. भारतात मुलींच्या जन्मापासून ते तिच्या लग्नापर्यंतचा एकूण खर्च अनेक योजनांमार्फत मिळवता येतो. मुळात मुलगी जन्माला येते त्या क्षणापासून तिच्या पालकांना शिक्षणाचा खर्च, उच्च शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च या सगळ्या गोष्टींची चिंता वाटू लागते. आता घाबरायची काही गरज नाही. LIC ने मुलींसाठी कन्यादान योजना आणली आहे. त्यामध्ये मुलीच्या शिक्षणापासून ते तिच्या लग्नापर्यंत तुम्ही छोट्या गुंतवणूकीतून फायदा मिळवू शकता.

LIC Kanyadan Scheme
Post Office Scheme : दिवसाला गुंतवा फक्त 50 रुपये अन् व्हा 35 लाखांचे मालक

१२१ रुपयांची गुंतवणूक (LIC Kanyadan Policy)

कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्ही मुलीचे भविष्य अधिक सुखसोयींनी भरू शकता. या योजनेत मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिला संपुर्ण रक्कम आणि त्याचे व्याज मिळते. यामध्ये मुलगी २ वर्षांची झाली की, १२१ रुपये दिवसाला म्हणजेच महिन्याला ३,६०० रुपये जमा करायचे असतात. पुढे जेव्हा मुलीचे २७ वय होते. तेव्हा ती रक्कम २७ लाखांपर्यंत होते. याचा लाभ मुलींना चांगल्या प्रकारे होतो. हा २५ वर्षांचा कालावधी असतो. म्हणजेच तुम्हाला २५ वर्षांचे १० लाखांचे २७ मिळतील. ही एक भन्नाट आणि सगळ्यात जास्त फायदा मिळवून देणारी पॉलिसी आहे.

LIC Kanyadan Policy अटी व नियम

LIC Kanyadan Policy चा लाभ घेण्यासाठी मुलीच्या बाबांचे वय ३० वर्षे असावे लागते. तर मुलीचे वय हे किमान १ वर्ष असायला हवे. एलआयसी कन्यादान पॉलिसी ही आयकर कायदा १९६९ च्या कलम ८० अंतर्गत येतो. त्यामुळे तुम्हाला दीड लाखांपर्यंत कराची सवलत मिळू शकते. यामध्ये समजा तुमच्या मुलीचा अकाली मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला १० लाखांपर्यंत मदत मिळते. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रिमियम भरण्याची आवश्यकताही नसतो.

मुलीचा संपुर्ण कालावधी पुर्ण झाल्यास मुलीचा २७ लाख रुपये दिले जातात. या योजनेत आवश्यक कागदपत्रे म्हणजे आई-वडीलांचे आधार कार्ड किंवा कोणताही ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी पुरावा, पासपोर्ट फोटो आणि मुलीचा जन्म दाखला असावा लागतो.

LIC Kanyadan Scheme
Easy Rava Dhokla Recipe: गुजराती स्टाईल रव्याचा मऊ लुसलुशीत ढोकळा बनवण्याची सोपी पद्धत
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com