Saam Tv
तुम्ही आत्ता पर्यंत बेसनाचा, तांदळाचा ढोकळा खाल्लाच असेल.
आज आपण रव्याचा मऊसूत जाळीदार ढोकळा कसा तयार करायचा? याची सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत.
रवा, दही, मीठ, साखर, पाणी, इनो, तेल, मोहरी, हिंग, हिरवी मिरची इ.
सर्वप्रथम रवा, दही, मीठ आणि अर्धा चमचा साखर एका भाड्यांत मिक्स करा.
आता त्यामध्ये पाणी घालत ढोकळ्याप्रमाणे जाड बॅटर तयार करून घ्या.
आता शेवटी त्यामध्ये इनो आणि एक चमचा पाणी मिक्स करा.
आता संपुर्ण मिश्रण वाफवायला ठेवावे. साधारण १५ ते वीस मिनिटे झाल्यावर तुमचा ढोकळा तयार झालाय का ते पाहून घ्या.
आता ढोकळ्यावर फोडणी द्यायला सुरुवात करा. त्यासाठी तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हिरवी मिरची घाला.
आता संपुर्ण फोडणी तुमच्या ढोकळ्यात घालून घ्या. तयार होईल रव्याचा खमंग आणि स्पॉंजी रेसिपी.