Saam Tv
गुंतवणूकीमुळे भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.
दिवसाला प्रत्येक जण २०० ते ३०० रुपये खर्च करतच असतो.
तुम्ही त्यातलेच ५० रुपये बाजूला काढून ठेवलेत तर तु्म्ही भविष्यात ३५ लाखांचे मालक होऊ शकता. ते कसं? जाणून घ्या.
ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) ही पोस्टाची जीवन विम्याची योजना आहे.
तुम्ही या योजनेमध्ये १०,००० ते १० लाख अशी गुंतवणुक करू शकता.
तुम्ही जर दररोज ५० रुपये यामध्ये गुंतवलेत तर भविष्यात तुम्हाला 35 लाखांचा परतावा मिळू शकतो.
ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणुक करण्यासाठी वय १९ ते ५५ आणि भारतीय नागरिक असावे.
तुम्ही या योजनेत गुंतवणुक केल्यास तुम्हाला ४ वर्षांनी तुम्हाला लोनच्या सुविधा मिळवू शकता.
वयाच्या ५५ व्या वर्षी तुम्ही मॅच्युरिटी ३१,६०,०० रुपये तर वयाच्या ६० वर्षी ३४.६० लाख रुपये रुपये मिळवू शकता.
तुम्ही ही संपुर्ण रक्कम वयाच्या ८० व्या वर्षी काढू शकता. तसेच तुम्ही त्यासाठी नॉमिनी सुद्धा ठेवू शकता.