Saam Tv
शरीराचा फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी आणि हाडे हेल्दी ठेवण्यासाठी शरीराला कॅल्शियमची गरज भासते.
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, शरीरातील सगळी हाडं मजबूत ठेवण्यासाठी आपण आहारातून भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे सेवन करणे गरजेचे असते.
अन्यथा ज्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमी असते. त्यांना कमी वयापासूनच कंबरदुखी, घुडगेदुखी, पाठदुखी अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
पुढे आपण कॅल्शियम वाढवण्यासाठी आहार नेमके कोणते महत्वाचे पदार्थ खाल्ले पाहिजेत या बद्दल जाणून घेणार आहोत.
दूध, तूप, दही, ताक, पनीर, चीज हे पदार्थ कॅल्शियम वाढवण्यासाठी खूप महत्वाचे असतात.
तुम्ही आहारात पालक, मेथी, शेपू, चवळी या महत्वाच्या भाज्यांचा समावेश करू शकता.
बदाम, अंजीर, खजूर, पांढरे तीळ, सुर्यफूलाच्या बिया, चिया सीड्स हे किमान एक एक खाल्याने आवश्यक पोषण नक्कीच मिळेल.