SBI Amrit Vrishti Scheme: स्टेट बँकेने ४४४ दिवसांची अमृत वृष्टी योजना पुन्हा केली सुरु; मिळतोय भरघोस परतावा

SBI Amrit Vrishti Scheme Re Activated: स्टेट बँकेने अमृत वृष्टी योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे. ही योजना मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. त्यानंतर १५ एप्रिलपासून पुन्हा सुरु करण्यात आली.
Amrit kalash
Amrit kalash Saam Tv
Published On

स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँकेने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. स्टेट बँकांच्या या योजनांमध्ये नागरिकांना भरघोस परतावा मिळतो. स्टेट बँकेने आपली ४४४ दिवसांची एफडी स्कीम (444 Days FD Scheme) पुन्हा एकदा सुरु केली आहे. हे योजना ३१ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. मात्र,आता ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे.

अमृत वृष्टी (Amrit Vrishti Scheme) योजनेत तुम्ही ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करु शकतात. कमीत कमी कालावधीत तुम्ही चांगला परतावा मिळवू शकतात. परंतु यावेळी अमृत वृष्टी योजनेच्या व्याजदरात २० बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. हे नवीन दर १५ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आले आहेत.

Amrit kalash
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिन्याला ५००० गुंतवा अन् ८ लाख मिळवा; वाचा कॅलक्युलेशन

स्टेट बँकेच्या वेबसाइटनुसार, अमृत वृष्टी या योजनेत सध्या नागरिकांना ७.०५ टक्के व्याजदर मिळते. याआधी या योजनेत ७.२५ टक्के व्याजदर मिळायचे. अमृत वृष्टी या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त फायदा होतो.या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याजदर मिळते.तर सुपर सिनियर सिटीजन असलेल्या नागरिकांना ७.६५ टक्के व्याजदर मिळते.

स्टेट बँकेच्या या योजनेत अनेकांनी गुंतवणूक केली होती. ही योजना मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. दरम्यान, ग्राहकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

Amrit kalash
Post Office Scheme: पोस्टाची भन्नाट योजना, फक्त व्याजातून कमवा २ लाख रुपये; मिळतोय जबरदस्त रिटर्न

अमृत वृष्टी योजनेसाठी अर्ज कसा करावा? (Amrit Vrishti Scheme Application Process)

अमृत वृष्टी ही एक टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेचा कालावधी ४४४ दिवसांचा आहे. ४४४ दिवसांसाठी तुम्ही गुंतवणूक करु शकतात. भारतीय नागरिक तसेच एनआरआयदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही स्टेट बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकतात. याचसोबत मोबाईल बँकिंग अॅपवरुनदेखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Amrit kalash
Scheme: पत्नीच्या नावावर १ लाख रूपये गुंतवा अन् मॅच्युरिटीवर ₹१६००० व्याज मिळवा, सरकारी योजनेचा जबरदस्त फायदा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com