HSC SSC Result 2026 Saam Tv
महाराष्ट्र

HSC SSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचे महत्त्वाचे पाऊल! दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच घेतला 'हा' निर्णय

Maharashtra Board Big Decision on HSC SSC Result 2026: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता बनावट प्रमाणपत्रांचा वापर रोखण्यासाठी बोर्डाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

Siddhi Hande

दहावी-बारावीच्या निकालाबाबत निर्णय

बोर्डाने पहिल्यांदाच केला बदल

बनावट प्रमाणपत्र बनवू नये, यासाठी निर्णय

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता बोर्डाने दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीच्या निकालाच्या नावावर अनेक फ्रॉड होताना दिसतात. आता या संपूर्ण प्रकाराला आळा बसणार आहे. बोर्डाने यासाठी महत्त्वाची पाऊले उचलली आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय (Maharashtra Board Impoartant Decision for hsc ssc students)

दहावी-बारावीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेकजण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. याच निकालाचा वापर करतात.परंतु आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे.

याशिवाय बोर्डाच्या निकालावर क्यूआर कोड देखील असणार आहे. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यावर विद्यार्थ्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला रआहे. यामुळे बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे.

दरम्यान, आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरु असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणत: एक महिन्याने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे.त्यामुळे दहावी-बारावीचा निकाल पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? (SSC HSC Result 2026 Date Revealed)

दहावी-बारावीच्या परीक्षा होऊन एक महिना उलटून गेला आहे. त्यामुळे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, अजून अधिकृत तारीख समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतीयांचा प्रवास जलद होणार, स्वप्न सत्यात उतरणार; देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा फोटो आला समोर

Masala Chaas Recipe: जेवणानंतर पिण्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा, टेस्टी मसाला ताक, नोट करा रेसिपी

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

SCROLL FOR NEXT