Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

Pawan Singh Wife: भोजपुरी पॉवरस्टार पवन सिंगची पत्नी ज्योती सिंग निवडणूक लढवत आहेत. मात्र, सध्या तिला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तिने आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीसाठी हात पुढे केला आहे.
Pawan Singh Controversy
Pawan Singh ControversySaam Tv
Published On
Summary

बिहार विधानसभा निवडणुक सुरु

भोजपुरी पॉवरस्टार पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंहची आर्थिक मदतीची मागणी

इंस्टाग्रामवर केली खास पोस्ट

Pawan Singh Wife: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. यावेळी अनेक भोजपुरी स्टार निवडणूक लढवत आहेत. यावेळी भोजपुरी पॉवरस्टार पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह देखील निवडणूक लढवत आहे. ज्योती बिहारमधील करकट विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहे.

ज्योती आपला जोरदार प्रचार करत आहे. घरोघरी जाऊन तिला मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत. अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या ज्योतीला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे तिने इंस्टाग्रामवर आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे.

Pawan Singh Controversy
Bridal Makeup Tips: यावर्षी लग्न ठरलयं? मग 'पिक्चर-परफेक्ट' ब्राईडल लुकसाठी या ७ टिप्स नक्की करा फॉलो

क्यूआर कोड शेअर करत ज्योतीने लिहिले, "राम आणि कृष्णासारख्या अवतारांनाही समाजाकडून खूप काही सहन करावे लागले. त्यांच्यासमोर मी तर एक तुच्छ महिला आहे. अनेक अत्याचार सहन करूनही काही जण माझ्यावर आरोप करतात. काही लोकांना माझ्या अश्रूंमध्ये फसवणूक आणि ढोंग दिसते. पण माझ्यासारख्या लाखो पीडितांच्या आवाजाला बळ देण्यासाठी, मी करकट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे."

Pawan Singh Controversy
Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

ज्योती सिंहने पुढे लिहिले, "मला प्रचंड जनतेचा पाठिंबा मिळत आहे. कृपया या निवडणूक मोहिमेला आणखी बळ देण्यासाठी मदत करा आणि खालील क्यूआर कोडवर देणगी पाठवा. मी मोठ्या आशेने तुमच्या दाराशी हात जोडून उभी आहे. गेल्या निवडणुकीपासून आजपर्यंत, मी करकट सोडले नाही आणि नेहमीच तुमचे सुख-दु:ख सहभागी असते. आज, तुमची ही मुलगी तुमच्याकडे मदत मागते आहे." यापूर्वीही, दिवाळीच्या काळात, ज्योती सिंहने जनतेकडून आर्थिक मदत मागणारी एक पोस्ट शेअर केली होती, परंतु नंतर ती डिलीट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com