महाराष्ट्र

Accident News: डोकं धडापासून वेगळं, डोळ्यासमोरच आईचा अपघाती मृत्यू; बाप गंभीर जखमी, यवतमाळमध्ये भीषण अपघात

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा नवरा आणि मुलगा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये महिलेचा नवरा आणि मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यवतमाळमधील राज्य महामार्गावर हा भीषण अपघात झाला. राळेगाव तालुक्यातील मंगी फाट्यासमोर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक देऊन हा अपघात झाला. अपघातामध्ये मृत्यू झालेली महिला नवरा आणि मुलासोबत दुचाकीवरून जाताना ही घटना घडली. या अपघातामुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत बायकोचा जागीच मृत्यू झाला. तर पती आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील मंगी फाट्यासमोर घडली. संतोषी किसन तोडसाम (वय ५० वर्षे) यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला. संतोषी या पळसकुंड येथे राहत होत्या. त्या नवरा आणि मुलासोबत दुचाकीने राळेगाववरून त्यांच्या गावी जात असताना हा अपघात झाला.

या अपघातामध्ये संतोषी यांचा नवरा किसन तोडसाम (वय ५५ वर्षे) आणि मुलगा जय तोडसाम (वय २८ वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की महिलेचे डोकं अक्षरश: धडापासून वेगळा झाले. याप्रकरणी वडकी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT