Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

Shruti Vilas Kadam

पायांचे स्नायू मजबूत होण्यास मदत

स्क्वाट्स करताना मांड्या, पोटऱ्या आणि नितंबांच्या स्नायूंवर काम होतं. नियमित सरावामुळे खालच्या शरीराची ताकद वाढण्यास मदत होऊ शकते.

Squats Benefits

नितंबांचे स्नायू सक्रिय होतात

स्क्वाट्स हा ग्लूट्ससाठी प्रभावी व्यायाम मानला जातो. योग्य पद्धतीने केल्यास नितंब आणि आसपासच्या स्नायूंना बळकटी देण्यास मदत होऊ शकते.

Squats Benefits

शरीराचा बॅलन्स सुधारण्यास मदत

स्क्वाट्स करताना शरीराचा समतोल राखावा लागतो. त्यामुळे नियमित सरावामुळे शरीरावरील नियंत्रण आणि स्थिरता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Slow Squats

दैनंदिन हालचाली सोप्या होऊ शकतात

खाली बसणे, खुर्चीतून उठणे, जिने चढणे अशा रोजच्या हालचालींमध्ये पायांची ताकद महत्त्वाची असते. स्क्वाट्समुळे ही कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Squats Benefits

कोअर स्नायू सक्रिय होतात

स्क्वाट्स करताना पोट आणि कंबरेभोवतीचे कोअर स्नायू शरीर स्थिर ठेवण्यासाठी काम करतात. त्यामुळे योग्य तंत्राने केल्यास कोअर मजबूत करण्याच्या व्यायामात त्याचा समावेश करता येतो.

Squats Benefits

कॅलरी खर्च वाढण्यास मदत

स्क्वाट्समध्ये शरीरातील मोठे स्नायू सक्रिय होत असल्याने ऊर्जा खर्च होते. मात्र वजन कमी करण्यासाठी स्क्वाट्सवर अवलंबून न राहता संतुलित आहार आणि इतर व्यायामही आवश्यक आहेत.

Benefits of Squats | Canva

नियमित व्यायामाची सवय लागते

दररोज १० मिनिटांचा स्क्वाट्सचा सराव हा व्यायामाची नियमितता निर्माण करण्याचा सोपा मार्ग ठरू शकतो. सुरुवातीला कमी repetitions करून हळूहळू क्षमता वाढवता येते.

Benefits of Squats

Pooja Birari: बांदेकरांच्या सुनबाईंचा मराठमोळा थाट! गुलाबी नऊवारीत पूजा बिरारीचा खुलला लूक

Pooja Birari | Saam Tv
येथे क्लिक करा