Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावर बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू

Pune Woman Dies in Zipline Accident: पुण्यातील २८ वर्षीय तरुणीचा झिपलायनिंग करताना दुर्दैवी मृत्यू झाला. झिपलाईन करताना ही तरुणी ३० फूट उंचीवरून खाली पडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली.
Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावत बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
Pune Woman Dies in Zipline AccidentSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

झिपलाईन हा साहसी खेळ खेळताना पुण्याच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झिपलायनिंग करताना ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राजगड वॉटरपार्कमध्ये ही धक्कादायक घटना घडली. तरल अटपाळकर असं मृत्यू झालेल्या २८ वर्षीय तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत वॉटर पार्कवर सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेली होती. कुटुंबीयांसमोरच या तरुणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, तरल अटपाळकर ही तरुणी पुण्यातील नऱ्हे परिसरामध्ये राहत होती. शुक्रवारी तरल आपल्या कुटुंबीयांसोबत पुण्यानजीकच्या भोरमधील राजगड वॉटरपार्कमध्ये सुट्टी इन्जॉय करण्यासाठी गेली होती. सर्वांनी दिवसभर वॉटरपार्कमध्ये राईडचा आनंद घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरल झिपलिंग करण्यासाठी गेली. तरल झिपलाईन करण्यासाठी ३० फूट उंचीवर गेली.

Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावत बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
Pune GBS: पुण्यात जीबीएसचा उद्रेक कशामुळे झाला? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

रोपवर चालत असताना तिने सुरक्षा दोर वरच्या बाजूला रेलिंग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी रेलिंगपर्यंत हात जात नसल्यामुळे तरलने जवळच्या लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्टूल हलला आणि बाजूला असलेल्या रेलिंगवरून तिचा पाय सटकला. त्यानंतर तरल थेट ३० फूट उंचीवरून खाली पडली. जमिनीवर डोकं जोरात आपटल्यामुळे तरल गंभीर जखमी झाली.

Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावत बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
Mumbai-Pune Highway Accident : बोर घाटात भीषण अपघात, ट्रकची ५ वाहनांना धडक, माय-लेकीचा मृत्यू, १२ जखमी

वॉटरपार्कमधील कर्मचारी आणि तरलच्या कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात हलवले. पण तोपर्यंत उशिर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या तरलचा मृत्यू झाला. याप्रकरणी आता वॉटरपार्क चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. सोबतच वॉटरपार्कचा निष्काळजीपणादेखील समोर आला आहे. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावत बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू
Pune News: इन्स्पेक्टरच्या खुर्चीत ऐटीत बसला, पोलीस कर्मचाऱ्याचा फोटो लिक; पण फोटो व्हायरल झालाच कसा? याच्या तपासावर भर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com