Hingoli Accident : भरधाव गाडीची बैलगाडीला धडक; शेतकऱ्यासह बैलाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

HIngoli News : नेहमीप्रमाणे पंडितराव मुळे हे शेतकरी शेतात कामासाठी निघाले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आकाश मुळे व बळीराम गच्छे असे तिघेजण मिळून गावाकडून निळा रोडने शेताकडे बैलगाडीत बसून शेतीच्या कामकाजासाठी निघाले
Hingoli Accident
Hingoli AccidentSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोलीच्या वसमतमध्ये शेतकऱ्याच्या बैलगाडीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने बैलगाडीला जोरदार धडक दिली. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव- निळा मार्गावर ही सदरची घटना घडली आहे. या अपघातात पंडितराव मुळे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे पंडितराव मुळे हे सकाळी शेतकरी शेतात कामासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आकाश मुळे व बळीराम गच्छे असे तिघेजण मिळून गावाकडून निळा रोडने शेताकडे बैलगाडीत बसून शेतीच्या कामकाजासाठी निघाले होते. याच वेळी हि दुर्घटना घडली. 

Hingoli Accident
Political News : बारामती ऍग्रोला विरोध केल्याने रोहित पवारांचे विरोधात काम; पक्षातील आमदाराकडूनच आरोप

समोरून जोरदार धडक 

यावेळी नांदेडच्या दिशेने वसमतकडे कोंबडी वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने मुले यांच्या बैलगाडीला समोरून जोरदार धडक दिली. यामध्ये पंडितराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश व इतर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तसेच घटनेत एका बैलाचा देखील मृत्यू झाला आहे. तर धडक देणारे वाहन देखील पलटी झाले होते. 

Hingoli Accident
Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; शिक्षकाची १५ लाख रुपयात फसवणूक

बैलगाडीला धडक देणारी गाडी देखील यात पलटी झाल्याने कोंबड्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. दरम्यान या घटनेनंतर वसमत ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तर परिसरातील नागरिकांनी मृत व जखमी झालेल्या शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केले होते. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com