Political News : बारामती ऍग्रोला विरोध केल्याने रोहित पवारांचे विरोधात काम; पक्षातील आमदाराकडूनच आरोप

Pandhapur News : करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदार यांच्यामधील अंतर्गत धुसफूस समोर आली
Pandhapur News
Pandhapur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : बारामती ऍग्रोला विरोध केल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी आमच्या विरोधात काम केले; असा थेट आरोप करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी केला आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्या या आरोपामुळे आता एकाच पक्षातील दोन आमदारांमधील वाद समोर आला आहे.

करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन आमदार यांच्यामधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. साखर कारखाना निवणुकीच्या निकालानंतर आमदार नारायण पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करत थेट निशाणा साधला आहे. 

Pandhapur News
Kalyan : मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी बनवाबनवी; बनावट कागदपत्र करत लाटले चार लाख रुपये; कल्याणमधील खाजगी रुग्णालयाचा प्रताप

निकालानंतर व्यक्त केली नाराजी 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार नारायण पाटील यांना बागल, जगताप गटाबरोबरच मोहिते पाटील गटाने पाठिंबा दिला होता. तर त्यांच्या विरोधात माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनलला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दिला होता. निवडणूक निकालानंतर आमदार नारायण पाटील गटाने मोठी बाजी मारली आहे. त्यावर आता आमदार नारायण पाटील यांनी रोहित पवार यांच्या विषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Pandhapur News
Nanded : लग्नाचा मंडप टाकताना काळाचा घाला, चुलत भावांचा मृत्यू, नांदेडमध्ये शोककळा

विरोध केला परंतु तक्रार नाही 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला देण्यास मी विरोध केला होता. त्यामुळेच आमदार रोहित पवार यांनी माझ्या विरोधात काम केलं आहे; असा स्पष्ट आरोप केला आहे. त्यांनी विरोध केला असला तरी मी त्यांच्या विरोधात कुठेही तक्रार करणार नाही; असे आमदार नारायण पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com