Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; शिक्षकाची १५ लाख रुपयात फसवणूक

Jalgaon News : २२ फेब्रुवारीला २ जणांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल; अशी बतावणी करत आमिष दाखविले. यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अधिकच फायदा मिळविण्यासाठी अनेकजण शेअर मार्केटच्या मागे लागले आहेत. मात्र याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार काहीजणांना हेरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष देत फसवणूक करत आहेत. अशाच प्रकारे एका शिक्षकाची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 

जळगाव शहरातील प्रेमनगर परिसरात वास्तव्यास असलेले शिक्षक जयेश अरविंदकुमार मेहता (वय ४९) यांची सदर प्रकारात फसवणूक झाली आहे. मेहता यांच्याशी २२ फेब्रुवारीला २ जणांनी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ५० टक्के नफा मिळेल; अशी बतावणी करत आमिष दाखविले. यासाठी एका ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. यावर शिक्षकाने देखील विश्वास ठेवला. 

Cyber Crime
Kalyan : मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीसाठी बनवाबनवी; बनावट कागदपत्र करत लाटले चार लाख रुपये; कल्याणमधील खाजगी रुग्णालयाचा प्रताप

सुरवातीला मिळाला परतावा 

दरम्यान समोरच्यानं सांगितल्यानुसार शिक्षकाने अँप डाउनलोड करत रजिस्ट्रेशन केले. यावर सुरुवातीला गुंतवणूक केलेल्या रकमेवर मेहता यांना २० हजार रुपयांचा परतावा देखील देण्यात आला. त्यातून मेहता यांचा अधिक विश्वास बसला. त्यामुळे शिक्षकाने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहिले. अशी साधारण १४ लाख ८३ हजार ५२५ इतकी रक्कम गुंतवणूक करून टाकली होती. 

Cyber Crime
Political News : बारामती ऍग्रोला विरोध केल्याने रोहित पवारांचे विरोधात काम; पक्षातील आमदाराकडूनच आरोप

सायबर पोलिसात गुन्हा दाखल 

टप्प्याटप्प्याने साधारण १५ लाख रुपये इतकी रक्कम गुंतविल्यानंतर देखील त्यांना कोणताही परतावा व मूळ रक्कम मिळाली नाही. दरम्यान रक्कम मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेश शर्मा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com