Maharashtra News Live Update: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

Marathi Breaking Live Headlines Updates : मातंग समाजाता मोर्चा अपडेट , दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, राहुल गांधी, ऑक्टोबर हिट, राज्यात पाऊस, देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Ulhasnagar: आज उल्हासनगरमध्ये ७ स्वीकृत नगरसेवकांची निवड

उल्हासनगर -

उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांची निवड आज, १ ऑक्टोबर रोजी विशेष महासभेत पार पडणार आहे.

सात जागांसाठी तब्बल ४२ इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महायुतीच्या जागावाटपानुसार भाजपला चार, तर शिवसेना शिंदे गटाला तीन जागा मिळणार आहेत.

दरम्यान, अर्जांच्या छाननीदरम्यान ४२ पैकी ३५ उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने प्रशासनाने त्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

आवश्यक व वैध कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक महिने रखडलेली ही निवड आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Jalgaon: चाळीसगावात रोहित पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा

जळगाव -

चाळीसगावात रोहित पवारांचा दुष्काळ पाहणी दौरा; कोणताही शेतकरी वंचित राहिला तर सरकारला महाग पडेल ; रोहित पवारांचा इशारा

अंधार पडल्यानंतरही पाहणी दौऱ्यात रोहित पवार यांनी जाणून घेतले शेतकऱ्यांचे दुःख

चाळीसगाव तालुक्यातील करगाव तांडा, तरवाडे, करजाई गावांत दुष्काळी परिस्थितीची पाहणी

शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन साधला संवाद

शेतातील मातीत बसून जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात शेतमाल विक्री 3 दिवस बंद राहणार

यवतमाळ जिल्ह्यात शेतमाल विक्री तीन दिवस बंद राहणार

खुल्या बाजारामध्ये पुढील तीन दिवस शेतमालाची विक्री बंद राहणार आहे 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे

त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या आहेत

यामुळे शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस बाजार समित्यांमधील शेतमालाजी खरेदी विक्री बंद राहणार आहे

यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सोमवारीच बाजारपेठेत घेऊन जाता येणार आहे.

Pune: पुणे महापालिका कर्मचारी भरतीची फेर तपासणी, 23 गावातील कामगारांच्या समावेशाचा पेच

पुणे -

पुणे महापालिका कर्मचारी भरतीची फेर तपासणी

23 गावातील कामगारांच्या समावेशाचा पेच

महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील 403 कर्मचाऱ्यांच्या समावेशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे

या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया नियुक्तीचे नियम आणि कागदपत्रांची फेर तपासणी करण्याचे निर्देश नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.

Pune: स्पॉट राऊंडमधून प्रवेश मिळालेल्या ओबीसी व्हिजेएनटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक रद्द

पुणे -

स्पॉट राऊंडमधून प्रवेश मिळालेल्या ओबीसी व्हिजेएनटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक रद्द

मेडिकल, अभियांञिकी, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्पॉट राऊंडमधून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांना शासन निर्णयाचा मोठा फटका

अभाविपसोबत दोन दिवसांपासून उपोषण विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू...

आमचा डिएनए ओबीसी असं सांगणाऱ्या शासनाकडून ओबीसी विद्यार्थी उपोषणाची साधी दखलही नाही

Pune:  शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

पुणे -

शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

येत्या ३ ऑक्टोबर रोजी शरद पवार जिल्ह्यात दुष्काळ दौऱ्याला सुरुवात करणार

बारामती, पुरंदर आणि दौंड या तीन तालुक्यांना भेट देणार

दौऱ्यादरम्यान शरद पवार शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

तसेच दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. या दौऱ्यात एका सभेचेही आयोजन करण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com