Shreya Maskar
ऑफिसमधून घरी आल्यावर झटपट हेल्दी आणि चटपटीत खायचे असेल तर दही कढी बनवा. दही कढीसोबत गरमागरम भात खूपच भारी लागेल.
दही कढी बनवण्यासाठी दही, बेसन, हिंग, लाल मिरची, हळद, आले, साखर , तेल,मोहरी, हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता, हिरवी कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
दही कढी सर्वप्रथम एका भांड्यात दही किंवा ताक घ्या, त्यात बेसन घालून चांगले मिसळा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, मोहरी आणि जिरे घालून तडतडू द्या. मिरच्या, बारीक चिरलेले आले आणि कढीपत्ता परतून घ्या.
काही सेकंद परतल्यावर, हळद आणि चिमूटभर हिंग घाला. आता बेसनाचे मिश्रण घ्या, ते पुन्हा ढवळून घ्या आणि नंतर कढईत घाला. चवीनुसार साखर आणि मीठ घाला.
मध्यम आचेवर कढी शिजू द्या. कढीला उकळी येऊ लागल्यावर, अधूनमधून ढवळत राहा. तुम्हाला घट्ट करी आवडत असल्यास, तुम्ही ती उकळू शकता.
कढी शिजल्यावर, गॅस बंद करा आणि हिरव्या कोथिंबिरीच्या पानांनी सजवा. तयार झालेली कढी भात किंवा रोटीसोबत खा.
कढी फुटू नये म्हणून दही-बेसनाचे मिश्रण घालताना गॅस कमी आचेवर ठेवा. साधारण 1 कप दह्यासाठी 1–2 टेबलस्पून बेसन पुरेसे असते.