Eknath Shinde Maharashtra government formation : महायुतीच्या शपथविधीला फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेत. पण अद्याप मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात कोण कोण असेल, याची नावे गुलदस्त्यात आहेत. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला, पण गृहमंत्रालयासाठी ते आग्रही असल्याचे समजतेय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आमदारांच्या वक्तव्यावरून गृहमंत्रिपदाचा पेच महायुतीत असल्याचे दिसतेय. गुलाबराव पाटील यांनी पत्रकारपरिषदेत गृहमंत्रालय शिवसेनेला मिळायला हवं, असे सांगितलं. त्यांनी प्रमोद महाजन यांच्या काळातील युतीचा दाखला देत गृहमंत्रालयावर दावा ठोकलाय. शिवसेनेच्या दाव्याला भाजपकडून काय उत्तर मिळतेय, हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय हवेय. त्यावर ते ठाम आहेत. त्याशिवाय गृहमंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही हस्तक्षेप नसावा, अशी अटही घातली आहे. एकनाथ शिंदेंकडे जे खातं असेल त्याचा अंतिम निर्णय शिंदेंचाच असेल, त्यात भाजप अथवा मुख्यमंत्र्यांचा कोणताही हस्तक्षेप नसेल, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली. भाजपकडून शिवसेनेची ही मागणी फेटाळण्यात आली.
नगरविकास खाते आणि इतर खात्यावरील मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण शिंदेंना मान्य नाही. अधिकाऱ्यांची बदली, किंवा त्यांच्या संदर्भातील निर्णयाचे शिफारस करण्याचे अधिकार मंत्र्यांना असतात, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचे असतात. हाच हस्तक्षेप एकनाथ शिंदे यांना नको असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांची मागणी भाजपने फेटाळली आहे.
एकनाथ शिंदे गृहमंत्रालय मिळावे, त्यावर ठाम आहेतच. त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे जी काही खाती असतील, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप नसावा, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी भाजप वरिष्ठांकडे केली आहे. भाजपकडून ही मागणी अमान्य केल्याचं समजतेय. त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय.
भाजपचा मुख्यमंत्री करण्यास शिंदेंनी ग्रीन सिग्नल दिला आहे.पण शिंदेंना गृहखातं हवं आहे. तसंच गृहखात्यात भाजपच्या मुख्यमंत्र्याचा हस्तक्षेप शिंदेंना नकोय. त्याशिवाय शिवसेनेला जे खातं दिलं जाईल त्याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदेंचाच असेल, अशी मागणी करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदेंची ही मागणी भाजपला अमान्य असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.