yavatmal, police saam tv
महाराष्ट्र

Police Uniform Allowance : पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर! गणवेश भत्त्यात वाढ

पोलिस अधिकाऱ्यांसाठी गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी खूशखबर आहे. कारण पोलिसांसाठी आन बान शान आणि अभिमान असलेल्या खाकी वर्दीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांसाठी गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. पोलीस अधिकाऱ्यांना आधी ५ हजार रुपये भत्ता मिळत होता.आता प्रतिवर्षी ६ हजार रुपये मिळणार आहे. पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक या अधिकाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. (Latest Marathi News)

शासन निर्णयानुसार, पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधीक्षक यांना दर वर्षांकरिता प्रत्येकी ५००० रुपये गणवेश अनुदार मंजुर करण्यात आले होते. सदर गणवेश अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत विचार सुरु होता. त्यानुसार गणवेश अनुदान वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांसाठीचा गणवेश अनुदान वाढीबाबतचा निर्णय १ जानेवारी २०२३ पासून लागू झाला आहे. त्यामुळे यापुढे पोलीस अधिकाऱ्यांना गणवेश अनुदान म्हणून पाच हजार रुपयाऐवजी सहा हजार रुपये गृह विभागाकडून दिले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: अचानक पैसा मिळेल, ५ राशींचे नव्या उत्पन्नाचे मार्ग खुले होतील; वाचा बुधवारचे राशीभविष्य

अबब! आयपीएलआधीच १५००० कोटींची डील, अख्खा संघ विकला; RR चा नवा मालक कोण?

Maharashtra Live News Update : अजित पवार अपघात प्रकरणी कर्नाटकात गुन्हा दाखल

लोकलला अचानक मोठा झटका बसला; भीतीनं घामाघूम प्रवाशांच्या ट्रेनमधून धडाधड उड्या, दादर स्टेशनवर थरार

Lasun Chutney Recipe : गावाकडे बनवतात तशी झणझणीत ओली लसूण चटणी, भातासोबत लागते मस्त

SCROLL FOR NEXT