Devendra Fadnavis: विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल!; महावितरण संपावर तोडग्यानंतर भाजपकडून फुल्ल हवा

महावितरणच्या हजारो कर्मचाऱ्यांनी काल ७२ तासांचा संप पुकारला होता.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSaam TV
Published On

मुंबई : राज्यातील महावितरण कर्मचाऱ्यांना पुकारलेला तीन दिवसीय संप काही तासांतच मिटला. राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस  यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत आता देवेंद्र फडणवीसांचं भाजपकडून कौतुक सुरु आहे. महाराष्ट्र भाजपने ट्वीट करत म्हटलंय की, विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल!

महावितरणच्या हजारो कर्मचाऱ्यांनी काल ७२ तासांचा संप पुकारला होता. मात्र काही तासातचं यावर तोडगा निघाला. देवेंद्र फडणवीस यांनी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर संपावर यशस्वी तोडगा निघाला. महावितरणच्या जवळपास ३२ कर्मचारी संघटना या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

Devendra Fadnavis
Yogi Adityanath: मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी योगी आदित्यनाथांना पायघड्या, काँग्रेसची सरकारवर सडकून टीका

भाजपने महावितरणचा संप मिटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. निरुपयोगीचे महाविकास आघाडीचे सरकार येवो किंवा जावो, हे बोलघेवडे बोलतच राहतील. प्रहर संपतील हे नुसतेच बघत राहतील! लोकोपयोगी ठरणारे केवळ जनतेचे सरकार. निरुपयोगींना दोन वर्ष एसटीचा संप मिटवता आला नाही, असं भाजपने ट्वीट केलंय. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis
Mahavitaran Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला; फडणवीसांनी बैठकीबाबत डिटेल सांगितलं

देवेंद्र असताना वीज संकट शक्यच नाही. विजेचा देवता 'देवेंद्र'. वीज कर्मचाऱ्यांचे संपाचे धक्के, विरोधकांना आनंदाचे मौके. पण फडणवीसांनी केला करेक्ट कार्यक्रम, एकदम ओके, असे अनेक ट्वीट महाराष्ट्र भाजपने केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com