Mahavitaran Strike : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटला; फडणवीसांनी बैठकीबाबत डिटेल सांगितलं

महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी दुपारी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली.
Mahavitaran Strike
Mahavitaran Strike Saam Tv
Published On

Mahavitaran Strike Update : महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अखेर तोडगा निघाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, बुधवारी दुपारी वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर संपावर यशस्वी तोडगा निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. महावितरणच्या जवळपास ३२ कर्मचारी संघटना या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. (Latest Marathi News)

Mahavitaran Strike
Eknath Shinde : 'धर्मवीर'वरून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट; मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

महावितरणच्या संघटनांसोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'वीज कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसाठी संप केला होता. काल रात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. या संपाबाबत या संघटनांशी संवाद झाला. या संपात ३२ संघटना चर्चेत होत्या. कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही संघटना होती. आमची अतिशय सकारत्मक चर्चा झाली'.

'राज्यसरकारला कोणत्याही कंपनीचं खासगीकरण करायचं नाही. या उलट पुढच्या तीन वर्षात ५० हजार कोटींची गुंतवणूक या तीन कंपनीत केली जाणार आहे. वेगवेगळ्या मालमत्तेच्या स्वरुपात ही गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे आमचा खासगीकरणाचा कोणताही विचार नाही. यापूर्वी ओडिसा, दिल्लीने ने ५१ टक्के खासगीकरण केलं आहे. पण महाराष्ट्राचा असा विचार नाही', असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Mahavitaran Strike
Anil Parab: ईडीची मोठी कारवाई! अनिल परब यांची 'इतक्या' कोटींची मालमत्ता जप्त; सोमय्यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

फडणवीस पुढे म्हणाले, 'आता जे काही नोटिफिकेशन काढलं, ते खासगी कंपनीने काढलं होते. जी काय आयुध उपलब्ध करून हितासाठी विचार झाला पाहिजे, असे आश्वासन मी दिले आहे. कंत्राटी कामगारांना स्पेशल केस म्हणून जी काही सुविधा देता येईल त्यानुसार त्यांचा समावेश कसा करता येईल हे आपण बघत आहोत. युनियनसोबत आम्ही चर्चा करू आणि कंत्राटी पद्धतीने जे काम करतात त्यांचा विचार होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com