Gondia Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: मध्यरात्री हिट अँड रनचा थरार, भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

Gondia Accident: गोंदियामध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary -

  • गोंदियात मध्यरात्री भीषण हिट अँड रनचा थरार

  • दुचाकीला भरधाव वाहनाची जोरदार धडक

  • दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी

  • पोलिस फरार चालकाचा शोध घेत आहेत

शुभम देशमुख, गोंदिया

गोंदियामध्ये हिट अँड रनची थरारक घटना घडली. भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. अपघातामध्ये वाहनाच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले. मृतदेहाचे अक्षरश: तुकडे झाले. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. या अपघाताची माहिती मिळताच गोंदिया पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांधजवळील पांढरवाणी नाल्यावर ही अपघाताची घटना घडली. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यामधील दोघांच्या अंगावर वाहनाचे चाक गेले. चाकाखाली आल्यामुळे त्यांच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले. मृतदेहाची ओळख पटवणे देखील कठीण झाले. तर या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली.

मध्यरात्रीच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात झाला. पांढरवाणी येथील नाल्यावर एका दुचाकीवरून एक पुरुष आणि दोन महिला प्रवास करत होत्या. यावेळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीचा चुराडा झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिला तातडीनं गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. हिट अँड रनच्या थरारानंतर फरार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT