Gondia School Accident: धक्कादायक! शाळेचा गेट कोसळून पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापिकेचीच मुलगी दगावली

Gondia school gate collapse News: गोंदियातील तिरोडा येथे शाळेचा जीर्ण गेट कोसळून पाचवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
Gondia School Accident
Gondia School AccidentSaam tv
Published On

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. तिरोडा येथील नगरपरिषदद्वारा संचालित पीएम श्री राणी अवंतीबाई प्राथमिक शाळा, लोधीटोला येथे शाळेचा मुख्य गेट कोसळल्याने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव कुमारी निराली मनीष चाफले (वय ११ वर्षे) असे असून, ती शाळा सुटल्यानंतर बाहेर पडत असताना हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचा मुख्य गेट गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

Gondia School Accident
Bollywood Actress: प्रसिद्ध अभिनेत्रीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक; स्वत: पोस्ट करून चाहत्यांना दिली माहिती

शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी बाहेर पडत असताना अचानक गेट कोसळला. यामध्ये निराली गेटखाली अडकली आणि ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर तिला तातडीने तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया येथे हलवण्यात येत होते. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्याआधीच रस्त्यात तिचा मृत्यू झाला.

Gondia School Accident
Crime News: घरमालकाने दरवाजा ठोठावला; ओळखीचा म्हणून विद्यार्थिनीनं दरवाजा उघडला, पण नंतर जे घडलं त्यानं सर्वच हादरले

निराली ही अत्यंत हुशार आणि गुणी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. तिने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत चौथा क्रमांक मिळवला होता. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे तिचा सन्मानही करण्यात आला होता. तिच्या आकस्मिक निधनामुळे शाळा आणि परिसरात शोककळा पसरली आहे. निरालीची आई शुभांगी चौधरी चाफले या त्याच शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे या घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, शाळांच्या इमारतींची नियमित तपासणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com