Hingoli Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Water Crisis : मार्चमध्ये पाणीटंचाईचे चटके; हिंगोली जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती, पाणी योजना ठरतेय फेल

Hingoli News : मराठवाड्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असल्याचे चित्र

संदीप नागरे

हिंगोली : राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणविण्यास सुरवात झाली आहे. मराठवाड्यात प्रामुख्याने समस्या अधिक बिकट बनली असून हिंगोली जिल्ह्यात तर मार्च महिन्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. पाणी योजनेचे काम झाले असताना देखील हिंगोली जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून करण्यात येत असलेला दावा फेल ठरत आहे. 

मराठवाड्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी केंद्र शासनाने मागील दोन वर्षात जल जीवन मिशन योजना राबवली आहे. मात्र याचा उपयोग होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

६१६ गावांमध्ये राबविण्यात आली योजना 

जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत गावात नव्याने विहिरी खोदण्यात आल्या. जलकुंभ उभे करण्यात आले. या सोबतच जिथे पाण्याचा सोर्स उपलब्ध करण्यात आला तिथून गावापर्यंत जलवाहिनी देखील टाकण्यात आली. तरी देखील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यात ६१६ गावांमध्ये जलजीवन मिशन योजना राबविण्यात आली. 

नियमित पाणीपुरवठ्याचा दावा ठरतोय खोटा 

यामध्ये २८९ गावात कामे प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ज्या गावांमध्ये योजनेचे काम पूर्ण झाले; अश्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा नियमितपणे होत असल्याची माहिती देखील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र या गावातील वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. ज्या गावात प्रशासनाने पाणीपुरवठा नियमित सुरू असल्याचा दावा केला, तिथेच पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. गावातील महिलांना पाण्याच्या शोधात तासंतास भटकंती करावी लागत आहे. दरम्यान शासनाने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करावे अशी मागणी गावकरी करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT