Cyber Crime : क्रेडीट कार्डवर ऑफर असल्याचे सांगत दोन लाख रूपयांचा गंडा; सायबर पोलिसांमुळे काही तासात रक्कम मिळाली परत

Dharashiv News : धाराशिव शहरातील एकाला सायबर गुन्हेगाराने फोन करत क्रेडिट कार्डवर ऑनलाईन खरेदीसाठी ऑफर असल्याचे सांगितले. ही ऑफर लागु करण्यासाठी संबंधितांकडे ओटीपी मागितला
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अनेकजण आमिषाला बळी पडत असल्याने त्यांची फसवणूक होत आहे. फसवणुकीसाठी वेगवेगळे अवलंब केला जात आहे. अशाच प्रकारे क्रेडिट कार्डवर ऑफर असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा प्रकार धाराशिवमध्ये समोर आला आहे. यात तब्बल २ लाख रुपयात फसवणूक करण्यात आली आहे. 

धाराशिव शहरातील एकाला सायबर गुन्हेगाराने फोन करत क्रेडिट कार्डवर ऑनलाईन खरेदीसाठी ऑफर असल्याचे सांगितले. ही ऑफर लागु करण्यासाठी संबंधितांकडे ओटीपी मागितला. ऑफर असल्याचे त्याचा फायदा घेऊ या विचाराने समोरच्यावर विश्वास ठेवत आलेला ओटीपी सांगितला. यानंतर लागलीच खात्यातुन १ लाख ९० हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्याचा संदेश प्राप्त झाला.  

Cyber Crime
Pune Porsche Accident Verdict: बाल न्याय मंडळाच्या निकालात ट्विस्ट, पोलिसांनी नेमका काय आक्षेप नोंदवला? मोठी अपडेट आली समोर

सायबर पोलिसात धाव 

ओटीपी सांगताच क्रेडीट कार्डमधुन १ लाख ९० हजार रुपये कपात झाल्याचा मेसेज मोबाईलवर प्राप्त झाला. यामुळे सैफअली यांना धक्का बसला. दरम्यान क्रेडिट कार्डवर ऑफर असल्याचा फोन बोगस असल्याचे लक्षात आले. यातून आपली फसवणूक झाल्याचे सैफअली सय्यद यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीसांत जात या प्रकरणी तक्रार केली.  

Cyber Crime
Chalisgaon Earthquake : भूकंप आला रे भो! चाळीसगावात गूढ आवाजाने खळबळ, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

लागलीच रक्कम मिळाली परत 

सैफअली यांनी दिलेल्या तक्रारीची लागलीच दाखल घेत यावरून सायबर पोलिसांनी ऑनलाईन नाकेबंदी केली. यामुळे फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराचा तपास लागला. यामुळे संबंधित ग्राहकाचे पैसे परत मिळवून देण्यात यश आले. दरम्यान एखादा सायबर गुन्हा घडल्यास तातडीने हेल्प लाईन क्रमांक १९३० वर कॉल करावा व ऑनलाईन तक्रार नोंदवावी अस आवाहन सायबर पोलीसांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com