Hingoli Police End Life Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Police: पोलिस अधिकाऱ्याने खाकी वर्दीत आयुष्य संपवलं, धावत्या ट्रेनसमोर उडी मारली; पोलिस दलात खळबळ

Hingoli Police End Life: हिंगोलीत पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारत त्यांनी आयुष्य संपवलं. धक्कादायक बाब म्हणजे खाक्या वर्दीत त्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली.

Priya More
  • हिंगोलीत पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

  • पोलिस उपनिरीक्षकाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

  • अमोल गंगलवाड यांनी आत्महत्या केली

  • हिंगोली पोलिस दलातील अधिकाऱ्याच्या आत्महत्येने खळबळ

  • खाकी वर्दीत पोलिस उपनिरीक्षकाने आयुष्य संपवलं

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोली पोलिस दलातून आज सकाळी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने रेल्वे समोर उडी मारत आत्महत्या केली. खाकी वर्दीमध्येच पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अमोल गांगणवाड असं या पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. ते हिंगोली पोलिस दलामध्ये पोलिस नियंत्रण कक्षात ते कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हा पोलिस दलातील नियंत्रण कक्षात रुजू असलेले पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड (वय ५० वर्षे) यांनी आत्महत्या केली. आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास धावत्या ट्रेनसमोर उडी मारत त्यांनी आयुष्य संपवलं. पूर्णा येथून अकोलाकडे जाणाऱ्या ट्रेनची ते वाट पाहत होते. ट्रेन जवळ येताच त्यांनी उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती रेल्वेचे लोकोपायलट यांनी हिंगोली रेल्वे स्टेशन मास्टर यांना दिली. त्यानंतर शहर पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

२ महिन्यापूर्वी परभणी पोलिस दलातून हिंगोली पोलिस दलात बदली झालेले पोलिस उपनिरीक्षक अमोल गंगलवाड मनमिळाऊ स्वभावाचे होते. कर्तव्यदक्ष असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळावर पोलिसांना सुसाईड नोट सापडली नाही. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Sugar Control Milk: ब्लड शुगर कंट्रोलसाठी 4 प्रकारचे दूध आहेत सर्वात बेस्ट; डायबिटीजच्या रुग्णांनी कोणते दूध प्यावे?

Online Shopping Charges : ऑनलाइन वस्तू मागवण्याआधी हे वाचा! सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्ज वाढणार

Political News : राजकारणात खळबळ! बडा नेता देणार राजीनामा; तारीखही केली जाहीर

Maharashtra News Live Update: नेपाळमध्ये अडकलेल्या 106 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू

Sprouts Benefits: रोज सकाळी नाश्त्यात स्प्राउट्स खा, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे!

SCROLL FOR NEXT