Police: खासगी वाहनांवरील 'पोलीस' पाटीला ब्रेक, हायकोर्टाच्या दणक्यानंतर राज्यभर कारवाईचे आदेश

Police Stickers on Private Vehicles: वाहनांवर पोलिसाची पाटी लावल्यास यापुढे कारवाई केली जाणार आहे. कोर्टाच्या दणक्यानंततर राज्यभर कारवाईचे आदेश देण्यात आले.
Police: खासगी वाहनांवरील 'पोलीस' पाटीला ब्रेक, हायकोर्टाच्या दणक्यानंतर राज्यभर कारवाईचे आदेश
Police Stickers on Private Vehicles: Saam Tv
Published On
  • खासगी वाहनांवरील पोलीस पाटीवर कारवाई

  • मुंबई उच्च न्यायालयाचा पोलीस पाटीबाबत आदेश

  • खासगी कारवर पोलीस लिहिल्यास दंड

  • महाराष्ट्रात पोलीस स्टिकरवर बंदी

  • मोटार वाहन कायद्यानुसार होणार कारवाई

संजय गडदे, मुंबई

राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावणे महागात पडण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अशा प्रकारावर नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने यासंदर्भातील पत्र राज्यभर पाठविले असून, खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी अथवा लाल अक्षरात 'पोलीस' लिहिलेल्या वाहनांवर महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १३३(६) तसेच मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १७७ अंतर्गत कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

Police: खासगी वाहनांवरील 'पोलीस' पाटीला ब्रेक, हायकोर्टाच्या दणक्यानंतर राज्यभर कारवाईचे आदेश
40 पोलीस अधिकाऱ्यांचा तडकाफडकी बदल्या; पोलीस दलात खळबळ

सखाराम कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर हा विषय पुढे आला. तक्रारीत, 'पोलीस' लिहिलेल्या खासगी वाहनांची तपासणी अनेकदा टाळली जाते. त्यामुळे अशा वाहनांचा अवैध वस्तूंची वाहतूक, बेकायदेशीर कृत्ये किंवा दहशत निर्माण करण्यासाठी गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले होते.

Police: खासगी वाहनांवरील 'पोलीस' पाटीला ब्रेक, हायकोर्टाच्या दणक्यानंतर राज्यभर कारवाईचे आदेश
Pune Police Crime: खाकीवर काळा डाग! पुणे पोलीस झाले दरोडेखोर; व्यावसायिकाचे 1 कोटी लुटण्याचं बिंग फुटलं

या पार्श्वभूमीवर हायकोर्टानेही अशा प्रथेवर तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यापुढे खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी पाटी किंवा मजकूर आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com