DCC Bank : परभणी-हिंगोली डीसीसी बँकेवर महायुतीचा झेंडा, मविआचा दारूण पराभव, विजेत्यांची नावे एका क्लिकवर

DCC Bank Election Results : परभणी-हिंगोली डीसीसी बँक निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला असून २१ संचालकांपैकी बहुसंख्य जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
Hingoli Parbhani DCC Bank Election Result
Hingoli Parbhani DCC Bank Election ResultSaam
Published On

संदीप नागरे | साम टीव्ही मराठी | हिंगोली प्रतिनिधी

Hingoli Parbhani DCC Bank Election Result : परभणी-हिंगोली डीसीसी बँकेच्या २१ संचालक पदांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीत १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित आठ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे, परभणी-हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान, तसेच हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांची सून राजमती मुटकुळे विजयी झाल्या आहेत. एकंदरीत निकालाचे चित्र पाहता महायुतीचे उमेदवार निवडून आल्यामुळे, जिल्ह्यातील राजकारणात अत्यंत महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या डीसीसी बँकेवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

परभणी-हिंगोली डीसीसी बँकेचा निवडणूक निकाल जाहीर

हिंगोली-परभणी डीसीसी बँकेचा निवडणूक निकाल आज जाहीर झाला आहे. २१ पैकी १३ उमेदवार या निवडणुकीत आधीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित आठ जागांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज सकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत नवघरे, परभणी-हिंगोली विधान परिषदेचे विद्यमान आमदार सईद खान आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा (विविध कार्यकारी सेवा सोसायटी) गटातून सौ. राजमती मुटकुळे यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला.

Hingoli Parbhani DCC Bank Election Result
Horoscope : शनिदेवाची कृपा होणार! २७ जुलैपासून ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचा योग

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB) निवडणुकीमध्ये २१ जागांपैकी १३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत:

  • रामप्रसाद बोर्डीकर (माजी आमदार व बँकेचे माजी अध्यक्ष - जिंतूर गट)

  • मेघना साकोरे-बोर्डीकर (आमदार - सेलू गट)

  • भावना मुंगसे-बोर्डीकर

  • सुरेशराव वरपूडकर (माजी आमदार व बँकेचे विद्यमान अध्यक्ष)

  • प्रेरणा समशेर वरपूडकर

  • राजेश विटेकर (आमदार व बँकेचे विद्यमान संचालक)

  • डॉ. रत्नाकर गुट्टे (आमदार - गंगाखेड गट)

  • सईद खान (आमदार)

  • पठाण मेहराज खान शेरगुल खान (आमदार सईद खान यांचे बंधू - पाथरी गट)

  • सुरेश देशमुख (माजी आमदार व ज्येष्ठ नेते)

  • राजेश पाटील गोरेगावकर (औंढा गट)

  • दिग्विजय पाटील गोरेगावकर (हिंगोली जिल्हा)

  • तुषार दुधाटे (गोळेगावकर) (पालम गट)

  • रुपाली राजेश पाटील गोरेगावकर (सेनगाव गट)

या निवडणुकीत प्रस्थापित राजकीय घराण्यांचे मोठे वर्चस्व पाहायला मिळाले असून, केवळ उर्वरित ८ जागांसाठीच मतदान प्रक्रिया पार पडली होती.

Hingoli Parbhani DCC Bank Election Result
Samruddhi Mahamarg : मुलीला पुण्याला MBA ला सोडलं, निरोप दिला अन्...; समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर निवडून आल्यानंतर आमदार सईद खान यांनी ठोकले दंड

"जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात आजी-माजी १० आमदार असतानाही माझा ३ मतांनी विजय झाला आहे. हे केवळ मतदार माझ्या पाठीशी असल्यामुळेच शक्य झाले," असे प्रतिपादन आमदार सईद खान यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला: "परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी नातेवाईक-सोयरधायऱ्यांचे राजकारण केले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर या ठिकाणचा आमदार मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून आणून दाखवतो," असे उघड आव्हान देत आमदार सईद खान यांनी दंड ठोकले आहेत. सईद खान यांनी थेट आमदार डॉ. राहुल पाटील यांनाच आव्हान दिल्यामुळे येणाऱ्या काळात हा राजकीय संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com