Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

Hingoli News : लोकसभा निवडकीसाठी पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे

संदीप नागरे

हिंगोली : लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी प्रशासनातील कर्मचारी तसेच शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Hingoli) मात्र अनेकजण या कामातून सुटका मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. तर (Election) काहीजण निष्काळजीपणा करत आहेत. अशाच प्रकारे निष्काळजीपणा करणे एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला भोवला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडकीसाठी (Lok Sabha Election) पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र निवडणुकीच्या कामातून सुटका मिळविण्यासाठी वेगवेगळी करणे दाखविली जात आहेत. अशांवर निवडणूक आयोग लाख ठेवून असून यात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. निवडणूक आयोगाकडून हि कारवाई केली जात आहे. 

त्यानुसार हिंगोलीमध्ये लोकसभा निवडणुक प्रक्रियेत निवडणूक विभागाने केंद्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. या नंतर देखील कामात हलगर्जीपणा करणाऱ्या सेनगाव महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. एस. जी. तळणीकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राचार्यांचे नाव असून हे प्राचार्य सेनगाव तालुक्यातील तोष्णीवाल महाविद्यालयात कर्तव्य बजावत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

Knee Pain: सतत गुडघे दुखणे हे कोणत्या गंभीर आजाराचे लक्षण आहे?

Maharashtra Politics: पालिकांवर नजर, ठाकरेसेनेचं शक्तीप्रदर्शन, भ्रष्ट मंत्र्यांवरून सरकारला घेरलं

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

SCROLL FOR NEXT