Santosh Bangar on Uddhav thackeray:
Santosh Bangar on Uddhav thackeray:  Saam tv
महाराष्ट्र

Santosh Bangar on Uddhav thackeray: 'उद्धव ठाकरेंच्या सभेत अनेक खुर्च्या रिकाम्या, लोक बाहेर जिल्ह्यातील; संतोष बांगर यांचं प्रत्युत्तर

संदिप नागरे

Santosh Bangar On Uddhav Thackeray :

हिंगोलीत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांचा गद्दार उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला आमदार बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरे यांच्या सभेत अनेक रिकाम्या खुर्च्या होत्या, अनेक लोक बाहेर जिल्ह्यातून आणले असल्याची टीका बांगर यांनी केली आहे. (Latest Marathi News)

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. ठाकरे यांच्या सभेत अनेक रिकाम्या खुर्च्या होत्या, अनेक लोक बाहेर जिल्ह्यातून आणले. आपण मागचे १२ वर्ष शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होतो. आजच्या सभेत ठाकरे यांनी माझ्यावर टीका केली आहे, ती माझ्यासाठी गौरव आहे, असे बांगर म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संतोष बांगर पुढे म्हणाले, 'मला असं वाटतं की, माझ्यात दम आहे म्हणून माझं नाव घेतलं. दम नसता तर माझं नाव घेतलं नसतं. मला ज्या उपमा उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत, त्यावरून वाटत आहे की, त्यांनी महाराष्ट्रात माझा गौरव केला आहे'.

'मी कालच सांगितलं होतं. उद्धव ठाकरे हिंगोलीत येतील, तेव्हा संतोष बांगर यांचा गौरवच करतील. त्यांनी स्टेजवर उभं राहून संतोष बांगरच्या बेंडकुळ्या बघितल्या. त्यामुळे याच्यापेक्षा भाग्यवान कोण? त्यामुळे उद्धव ठाकरेंनी गौरव केला आहे, असे बांगर म्हणाले.

'आपण नागाला दूध पाजले, तो नाग डसला' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना बांगर म्हणाले, 'उद्धव ठाकरेंना कल्पना आहे की, नाग शेतकऱ्यांचा मित्र असतो. नाग शंभो देवाच्या गळ्यातलं वाहन आहे. त्यांना माहीत आहे की, संतोष बांगर नागनाथाचा भक्त आहे. त्यामुळे नागनाथाच्या भक्ताला कोणती उपमा द्यायची, तर नागाची उपमा द्यायची हे त्यांना माहीत आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election: 'मोदी-राज' सभेनंतर उद्धव ठाकरे सुपरफास्ट, मुंबईत एकाच दिवशी 4 सभांचा धडाका

Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Lord Shiva: महादेवाच्या पिंडावर थेंब-थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

South Mumbai Lok Sabha: दक्षिण मुंबईचा खासदार कोण होणार? शिवसेनेच्या दोन गटात लढत

Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; गाझातील बॉम्ब हल्ल्यात झाले होते शहीद

SCROLL FOR NEXT