Uddhav Thackeray Hingoli Sabha: गेल्या वर्षी रक्षाबंधनमध्ये एकच फोटो समोर आला होता. तो म्हणजे पंतप्रधान मोदी यांना राखी बांधण्याचा. पंतप्रधानांना राखी बांधली आणि कारवाई थांबली, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांचं नाव न घेता त्यांच्यावर केली आहे.
ते म्हणाले की, ''हसन मुश्रीफ यांच्या पत्नीने रस्त्यावर येऊन टाहो फोडला होत्या. किती वेळा धाडी ठाकणार आमच्या घरावर, अशी छळवणूक करण्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला आणि विषय संपून टीका, असं त्यांच्या पत्नी म्हणाल्या होत्या. मात्र आता दीड महिने झाले हसन मुश्रीफ अजित पवार यांच्यासोबत भाजपमध्ये गेले आणि ईडी हसन मुश्रीफ यांचा पत्ता विसरून गेली.'' हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे गटाची सभा झाली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ''या वर्षी रक्षाबंधनाबद्दल पंतप्रधानांनी सांगितलं की, या वर्षीच रक्षाबंधन मुस्लीम महिलांकडून राखी बांधून घ्या. जर मी हे बोललो असतो तर दोन उप आणि एक मुख्य, म्हणजे एक फुल दोन हाफ माझ्या अंगावर आले असते.'' (Latest Marathi News)
या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ''आज मी गद्दारांवर बोलण्यासाठी वेळ घालवणार नाही. गद्दारांना तुम्हीच धडा शिकवणार आहात. हिंगोली कायम शिवसेनाप्रमुखांच्या विचारांसोबत राहिलेली आहे. आता काही बेंडकुळ्या आहेत, परंतु त्यांच्यात केवळ हवा असून खरी ताकद माझ्याकडे आहे. मटक्याचे अड्डे चालवणाऱ्यांना हिंदू म्हणायचं का? अशांचा उद्धटपणा आपल्याला गाडून टाकावा लागले.''
हिंगोलीतील रामलीला मैदानावर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' शंभूदेवाला प्रार्थना करतो की, शेतकऱ्यांसाठी भरभरून दे. शेतकऱ्यांवर अवकृपा होऊ देऊ नको. काही जणांना अपेक्षा आहे, मी गद्दारपणावर बोलेन. पण मी त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे. गद्दारासाठी आलो नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.