Uddhav Thackeray News: 'डबल इंजिन' सरकार हवेत थापांच्या वाफा सोडतंय, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Uddhav Thackeray News: 'डबल इंजिन' सरकार हवेत थापांच्या वाफा सोडतंय, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले आहे.
Udhav thackeray News
Udhav thackeray NewsSaam tv
Published On

Uddhav thackeray News:

हिंगोलीमध्ये शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिल्याच निर्धार सभेत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.'राज्यात शेतकरी हवालदिल आहे,मात्र सरकार फिरत आहे. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लयभारी'. तसेच हे 'डबल इंजिन' सरकार हवेत थापांच्या वाफा सोडतंय, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आसूड ओढले आहे. (Latest Marathi News)

शिवसेनेच्या फुटीनंतर मराठवाड्याच्या हिंगोलीमध्ये शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिलीच निर्धार सभा आयोजित करण्यात आली. हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं. सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Udhav thackeray News
Devendra Fadanvis News: सकाळी एक भोंगा सुरू होतो अन्... 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात फडणवीसांची फटकेबाजी

हिंगोलीतील रामलीला मैदानावर उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ' शंभूदेवाला प्रार्थना करतो की, शेतकऱ्यांसाठी भरभरून दे. शेतकऱ्यांवर अवकृपा होऊ देऊ नको. काही जणांना अपेक्षा आहे, मी गद्दारपणावर बोलेन. पण मी त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही. मी तुमच्यासाठी आलो आहे. गद्दारासाठी आलो नाही'.

'श्रावण महिना सुरू झाला आहे. नागपंचमी झाली. गद्दारांना साप समजून पूजायाला लागलो. पायाखाली साप आला तर शेतकऱ्यांना काय करायचं हे माहीत आहे. अवैध धंदे करणारा हिंदू असेल का, असू शकतो? हिंगोलीचे गद्दार उद्धटपणा करतात, त्यांना गाडून टाका, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

'राज्यात शेतकरी हवालदिल आहे,मात्र सरकार फिरत आहे. सरकार आपल्या दारी, थापा मारतंय लयभारी. हे 'डबल इंजिन' सरकार हवेत थापांच्या वाफा सोडतंय, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.

Udhav thackeray News
BJP On MNS Jagar Yatra: राजकीय कोंडी सोडवण्यासाठी मनसेचं जागर आंदोलन; भाजपची टीका

'अरे इथल्या शेतकर्‍याला अतिवृष्टी झाली, त्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर आपण आहोत. शेतकर्‍यांचा गुन्हा काय? सरकार बदलल्यानंतर आस्मानी संकट समजू शकतो, पण गद्दारांची जी सुलतानी आलेली आहे, या सुलतानीचं संकट त्याहीपेक्षा मोठं आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

'जे जे शेतकर्‍याच्या हिताचं असेल ते चिरडून टाकायचं, इतकच काम हे इथे बसलेले आणि त्यांचे दिल्लीतील मायबाप करतं आलेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com