BJP On MNS Jagar Yatra: राजकीय कोंडी सोडवण्यासाठी मनसेचं जागर आंदोलन; भाजपची टीका

Mumbai Goa Highway:भाजपडून देखील मनसेच्या आंदोलनावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
BJP On MNS Jagar Yatra
BJP On MNS Jagar YatraSaam TV
Published On

Maharashtra Political News:

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी मनसेचे आंदोलन सुरु झाले आहे. रविवारी पनवेल येथून अमित ठाकरेंच्या नेतृत्वात जागर यात्रेला सुरुवात झालीये. या यात्रेत भाजपविरोधात बॅनरबाजी आणि घोषणा दिल्या जातायत. अशात भाजपकडून देखील मनसेच्या आंदोलनावर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसेचे हे आंदोलन म्हणजे स्वताची राजकीय कोंडी दूर करण्यासाठीचा केविलवाना प्रयत्न, असल्याचं म्हटलं आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण याचं राजकारण करण्यात काहीच अर्थ नाही, असा टोला भातखळकरांनी मनसेला लगावला आहे.

BJP On MNS Jagar Yatra
Maharashtra Politics : अजित पवारांनी तो निर्णय का घेतला? तटकरेंचे टीकाकारांना सडेतोड उत्तर

रस्त्याच्या कामाची माहिती देताना भातखळकर पुढे म्हणाले की, "रत्नागिरीपर्यंतचा रस्ता होण्यास वेळ लागत आहे. रस्ता यूपीएच्या काळात खोळंबला आहे. गणेशोत्सवाआधी सिमेंटची एक लेन पूर्ण तयार होत आहे. दुसरी लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तीन चार महिन्यांमध्ये महाड ते रत्नागिरीमधील कशेडी घाट हे अंतर दहा मिनिटात पूर्ण होणार आहे."

"महामार्गाचं काम टप्प्यात असताना असं आंदोलन करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे. अशा आंदोलनाला कुणीही फसणार नाही. यातून मनसेची राजकीय कोंडी अजिबात दूर होणार नाही.", अशा शब्दांत भातखळकरांनी मनसेच्या जागर आंदोलनावर टीकास्त्र सोडलंय.

BJP On MNS Jagar Yatra
राजकीय भूकंपाच्या दाव्यावरून जोरदार हादरे; वडेट्टीवारांना शहाजीबापूंचं खणखणीत उत्तर | Maharashtra Politics

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील मनसेच्या आंदोलनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. दानवेंनी सरकारवर टीकास्त्र सोडत मनसेला सल्ला दिला आहे. मुंबई- गोवा रस्ता दयनीय झाला आहे. कोकणातील जनता सहनशील आहे. मात्र सरकार अंत पाहतेय. सरकारने उत्तर द्यावे. राजकीय पक्षाने आंदोलन करावे मात्र जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मनसेने आंदोलन करुनये असं मी मुळीच म्हणणार नाही. पण यातून जनतेला त्रास कमीतकमी व्हावा याची खबरदारी देखील आंदोलन करताना घेतली पाहिजे, असं अंबादास दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com