Maharashtra Politics : अजित पवारांनी तो निर्णय का घेतला? तटकरेंचे टीकाकारांना सडेतोड उत्तर

NCP (Ajit Pawar Faction) Melava at Chhatrapati sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा झाला.
Sunil Tatkare - Ajit Pawar, maharashtra Politics
Sunil Tatkare - Ajit Pawar, maharashtra PoliticsSAAM TV
Published On

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Sunil Tatkare on Ajit Pawar : भाजप-शिवसेनेला (शिंदे गट) पाठिंबा देत अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका होते. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी उत्तर दिले आहे. अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तो निर्णय घेतला, असे तटकरे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात सुनील तटकरे यांनी टीका करणाऱ्या विरोधकांना सडेतोड उत्तरे दिली. (Latest Marathi News)

तटकरे म्हणाले की, 'दादांनी घेतलेल्या निर्णयामुळे एक नवीन चैतन्य निर्माण झाले आहे. आम्ही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी झालो. राज्यातील सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो.'

अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाची इंडिया (INDIA) आघाडीतील घटकपक्षांनी देखील दखल घेतली आहे. आमच्या मूळ विचारावर आम्ही ठाम आहोत. अजित पवारांनी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी तो निर्णय घेतला असून, केवळ खुर्चीसाठी घेतला नाही, असे तटकरे यावेळी म्हणाले.

Sunil Tatkare - Ajit Pawar, maharashtra Politics
Pandharpur News : दादा, काही तरी करा... सोलापूर जिल्ह्यातील 40 साखर कारखाने अडचणीत येतील, अजित पवारांपुढे आमदार यशवंत मानेंची व्यथा

अजित पवारांकडे विश्वासार्ह नेतृत्व म्हणून बघितले जाते. आमच्यावर वेगवेगळ्या बैठकांमध्ये टीका-टिप्पणी केली जाते. मात्र अजित पवारांवर टीका करणाऱ्यांना येणाऱ्या काळात महाराष्ट्राची जनता उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

शिवसेना आणि भाजपसोबत दीर्घकाळ वैचारिक लढाई देत आलो. २०१९ मध्ये आम्ही भाजप- शिवसेना युतीविरोधात लढलो. तेव्हा युतीला विधानसभेत महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट कौल दिला होता. ज्या दोन पक्षांची विचारधारा सारखी आहे, त्यातील एका पक्षासोबत आम्ही २०१९ मध्ये सहभागी झालो, तर आता अजित पवारांनी २०२३ मध्ये दुसऱ्या पक्षासोबत जायचा निर्णय घेतला. यात चुकीचे काय? २०१९ मध्ये टीका न करणाऱ्यांना आता टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

Sunil Tatkare - Ajit Pawar, maharashtra Politics
Maharashtra Politics: शेतकरी आर्थिक संकटात, अजित पवारांची सभेसाठी लाखोंची उधळपट्टी; बीडमधील सभेवरून ठाकरे गटाचा गंभीर आरोप

अजित पवारांचे नेतृत्व शब्दाचे आणि विचारांचे पक्के आहे. मला सुद्धा उद्याच्या जाहीर सभेत काहीतरी बोलायचं आहे, उत्तर म्हणून नाही तर भूमिका मांडायची आहे. हा पहिलाच मेळावा आहे. याला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा महायुतीला मिळतील, असा प्रयत्न करायचा आहे, असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com