राजकीय भूकंपाच्या दाव्यावरून जोरदार हादरे; वडेट्टीवारांना शहाजीबापूंचं खणखणीत उत्तर | Maharashtra Politics

Shahaji Bapu Patil criticizes Vijay Wadettiwar : सध्याच्या काँग्रेसमध्ये राज्यात एकही प्रभावी नेता राहिलेला नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी‌ पक्षनेतेपद देण्यात आलेले आहे, असा पलटवार शहाजीबापूंनी केला.
Shahaji Bapu Patil criticizes Vijay Wadettiwar News In Marathi
Shahaji Bapu Patil criticizes Vijay Wadettiwar News In Marathi
Published On

Shahaji Bapu Patil slams Vijay Wadettiwar : सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन मुख्य खुर्ची जाईल, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या राजकीय भूकंपाच्या दाव्याचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात अद्यापही बसत आहेत. शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनीही वडेट्टीवारांना खणखणीत उत्तर दिलं आहे.

येत्या १५ ते २० दिवसांत म्हणजे सप्टेंबरमध्ये राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ होईल. त्याचा फटका मुख्य खुर्चीला बसेल, असा दावा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता.

यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी वडेट्टीवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचं राजकारण कळण्याइतपतही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) मोठे नेते नाहीत, अशी सणसणीत टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.

सध्याच्या काँग्रेसमध्ये (Congress) राज्यात एकही प्रभावी नेता राहिलेला नाही. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी‌ पक्षनेतेपद देण्यात आलेले आहे, असा पलटवारही त्यांनी केला.

महाराष्ट्र राज्य हे देशात प्रबळ आणि मोठं आहे. राज्याच्या राजकारणातील खुर्ची कधी बदलणार हे कळण्याइतपत विजय वडेट्टीवार हे मोठे नेते नाहीत. आपलं अस्तित्व टिकवण्याची त्यांची ही धडपड सुरू आहे, असा टोलाही शहाजीबापूंनी लगावला.

आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली महायुती लढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com