Earthquake Saam Digital
महाराष्ट्र

Hingoli Earthquake News : हिंगोलीकर साखर झोपेत असताना जमिनीतून गूढ आवाज आणि हादरे, नागरिकांमध्ये घबराट

Hingoli Breaking News : भूकंपाची भूमापक केंद्रावर अद्याप देखील नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.

संदीप नांगरे

Hingoli News :

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. गुरुवारी मध्यरात्री नागरिक साखर झोपेत असताना अचानक जमिनीमध्ये गुढ आवाज होऊन हादरे बसले. घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडत मोकळ्या जागी पळ काढला.

दरम्यान हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने देखील भूकंपाचे हे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती दिली आहे. मात्र या भूकंपाची भूमापक केंद्रावर अद्याप देखील नोंद झाली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी, वसई तर वसमत तालुक्यातील, वापटी, कुपटी, पांगरा, कुरुंदा यासह २० गावांमध्ये हे धक्के जाणवले असल्याचे प्रशासन व नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Latest News Update)

मागील तीन वर्षांपासून या भागात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असून या भूकंपाची लातूर येथील भूमापक केंद्रावर अनेक वेळा नोंद झाली आहे. आज देखील या भागात भूकंपाचा सोम्य धक्का जाणवल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने या गावांमध्ये जाऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आता करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

OBC Reservation On Corporators: ओबीसी कोट्यामुळे 'या' नगरसेवकांना मोठा धक्का|VIDEO

SCROLL FOR NEXT