मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज तब्बल ६ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान सर्व प्रकारची वाहने, हलकी व जड-अवजड वाहने यांची वाहतूक तब्बल ६ तासांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनतर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू केले आहे. त्यामुळे चिखले ब्रिज येथे गुरुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत स्पेशल ब्लॉक (Mumbai To Pune) घेतला जाणार आहे. तब्बल ६ तासांचा हा ब्लॉक असून यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत वाहनचालकांनी पोलिसांना (Police) सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग कोणते याची माहिती जाणून घेणे वाहनचालकांसाठी गरजेचे आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने मुंबई लेन पनवेल एक्झिटवरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावर करंजाडेमार्गे कळंबोली वळविण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून पुण्याकडून मुंबईला येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येणार आहे.
पुण्याकडून मुंबईकडे येणारी हलकी वाहने खोपोली एक्झिटवरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून मार्गस्थ करण्यात येतील.
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.