Nashik News: कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेल्या, पुन्हा परतल्याच नाही; तरुणींसोबत घडली भयानक घटना

Nashik Nandgaon News: कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी(८ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Nashik breaking news two school girls drowned in water  incident in Nandgaon taluka
Nashik breaking news two school girls drowned in water incident in Nandgaon talukaSaam TV
Published On

अजय सोनवणे, साम टीव्ही

Nashik Nandgaon Breaking News

नाशिक जिल्ह्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बुधवारी(८ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पूजा अशोक जाधव (वय १६ वर्ष) खुशी देवा भालेकर (वय १६ वर्ष) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik breaking news two school girls drowned in water  incident in Nandgaon taluka
IMD Rain Alert: राज्यात ऐन थंडीत बसरणार पावसाच्या सरी; काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव तालुक्यातील (Nashik News) चिंचविहीर तांडा येथील तीन अल्पवयीन मुली बुधवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी केटी बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. कपडे धूत असताना यातील एका मुलीचा पाय घसरल्याने ती बंधाऱ्यातील पाण्यात पडली.

तिला वाचवण्यासाठी दोन मुलींनी पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. आरडाओरड झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुलींना वाचवण्यासाठी काहींनी पाण्यात उड्या घेतल्या.

मात्र, यातील कावेरी भालेकर या मुलीला गावकऱ्यांनी वाचवले. मात्र, पूजा जाधव आणि खुशी भालेकर खोल पाण्यात बुडाल्याने बेशुद्ध झाल्या. दरम्यान, नागरिकांनी त्यांना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

कपडे धुण्यासाठी बंधाऱ्यावर गेलेल्या मुलींवर काळाने घाला घातल्याने चिंचविहीर तांडा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे करीत आहेत.

Nashik breaking news two school girls drowned in water  incident in Nandgaon taluka
Breaking News: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर तब्बल ६ तासांचा ब्लॉक; वाहतुकीत मोठे बदल, कुठल्या वेळेत रस्ता बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com