Kalamnuri Assembly Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Kalamnuri Assembly Constituency: कळमनुरी विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय? महाविकास आघाडी की महायुती, विजयाचा गुलाल कोण उधळणार?

Rohini Gudaghe

लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अलर्ट मोडमध्ये आहे. सुरुवातीपासूनच काँग्रेसने कळमनुरी विधानसभा मतदारसंघांत अधिराज्य गाजवलं आहे. सध्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीची सत्ता आहे. शिंदे गटाचे संतोष बांगर हे विद्यमान आमदार आहेत.

आता आगामी निवडणुकीमध्ये महायुतीचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं (Kalamnuri Assembly Constituency) आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी देखील ही जागा कोणत्या घटक पक्षाला सोडणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कळमनुरी मतदारसंघाचे राजकारण मुस्लीम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजावरच अवलंबून आहे. आतापर्यंत कॉंग्रेस चार वेळेस सत्तेत राहिलेले आहे.

२०१४ चा विधानसभा निवडणूक निकाल

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघात २०१४ साली तिरंगी लढत झाली (Vidhan Sabha Election 2024) होती. कळमनुरीमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस उमेदवार संतोष टारफे यांनी शिवसेनेचे उमेदवार गजानन घुगे यांचा केवळ तीनशे मतांनी पराभव केला होता. टारफे यांनी ५६, ५६८ मतं मिळवून दणक्यात सत्ता स्थापन केली होती. तर शिवसेनेचे गजानन घुगे यांना ५६ हजार २६८ मतं मिळाली होती. भाजप उमेदवार शिवाजी माने यांना ३८ हजार ०८५ मतं मिळाली होती.

२०१९ चा विधानसभा निवडणूक निकाल

कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक महत्वाचा भाग (Maharashtra Politics) आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे संतोष बांगर ८२, ५१५ मतं मिळवून विजयी झाले होते. तर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे उमेदवार अजित मगर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. संतोष बांगर यांनी १६, ३७८ मतांनी विजय मिळवला होता.

सध्या काय चित्र आहे?

कळमनुरी (Hingoli) विधानसभा मतदारसंघांत जर वंचित बहुजन आघाडीला चांगला उमेदवार मिळाला तर याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी तालुक्यात विविध विकास कामं केलेली (MVA Against Mahayuti) आहेत, त्यामुळे ते जास्तच चर्चेत आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महायुती विद्यमान आमदार असलेल्या जागा आगामी निवडणुकीत त्याच घटक पक्षाकडे ठेवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कदाचित पुन्हा कळमनुरी मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात असेल, आता महाविकास आघाडी ही जागा कोणाला देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मतदार संघातून महविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे अजय उर्फ गोपू पाटील हे नाव मतदारसंघात चर्चेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT