Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?

Shivsena Thackeray Group Possible Seats List For Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत ३६ पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करणार आहेत. २५ जागांसाठी ठाकरे गट आग्रही असणार आहे.
Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?
Uddhav Thackeray Saam TV
Published On

गिरीष कांबळे, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याची तयारी केली आहे. लोकसभेप्रमाणे (Loksabha Election 2024) विधानसभेमध्ये (Vidhan Sabha Election 2024) सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही राहणार आहे. महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत ३६ पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे राहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती ऑगस्टमध्ये होणार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १४ जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यातील ८ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत. तर ६ आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो. तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती आहे.

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?
Maharashtra Politics: शिवसेनेत मोठ्या राजकीय घडामोडी! अंबरनाथ आणि उल्हासनगर कार्यकारणी बरखास्त ; पक्षश्रेष्ठींचा महत्वाचा निर्णय

२०१९च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ ४ आमदार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला. २०२४ ची लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा ठाकरेंनी ४ पैकी ३ जागा निवडून आणल्या. त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असणार आहे. या विधानसभा निवडणुकीकडे शिवसेना ठाकरे गटाचे विशेष लक्ष असणार आहे.

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?
Sharad Pawar Video : ...अन् मला पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली; बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेत शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

शिवसेना ठाकरे गट मुंबईत या संभाव्य जागा लढवण्याची शक्यता -

  • १) शिवडी

  • २) भायखळा

  • ३) वरळी

  • ४) माहीम

  • ५) चेंबूर

  • ६) भांडुप पश्चिम

  • ७) विक्रोळी

  • ८) मागाठाणे

  • ९) जोगेश्वरी पूर्व

  • १०) दिंडोशी

  • ११) अंधेरी पूर्व

  • १२) कुर्ला

  • १३) कलिना

  • १४) दहिसर

  • १५) गोरेगाव

  • १६) वर्सोवा

  • १७) वांद्रे पूर्व

  • १८) विलेपार्ले

  • १९) कुलाबा

  • २०) वडाळा

  • २१) चांदीवली

  • २२) बोरिवली

  • २३) मलबार हील

  • २४) अनुशक्ती नगर

  • २५) मानखुर्द शिवाजीनगर

Vidhan Sabha Election 2024: विधानसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरली, २५ जागांसाठी आग्रही, संभाव्य जागांची यादी समोर?
Sanjay Raut: 'छगन भुजबळ मोठे कलाकार, रंग बदलून नाट्य निर्माण करण्यात माहिर', संजय राऊतांचा खोचक टोला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com